Infinix Note 40 Pro 5G सिरीज भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे. हा फोन आधीच जागतिक बाजारपेठेत लाँच केला गेला आहे. या सिरीजअंतर्गत, कंपनीने भारतात Infinix Note 40 Pro आणि Pro+ 5G हे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. लाँचसोबतच या सिरीजच्या बेस मॉडेलची अर्ली बर्ड सेलही आजपासून म्हणजेच 12 एप्रिलपासून सुरू झाली आहे. अर्ली बर्ड सेलमध्ये तुम्हाला फोनवर उत्तम ऑफर मिळतील. चला तर जाणून घेऊयात स्मार्टफोन्सची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
हे सुद्धा वाचा: अरे बापरे! OnePlus फोन्सची मोबाईल शॉप आणि रिटेल स्टोअर्सवर विक्री होणार बंद? 1 मे पासून होईल परिणाम। Tech News
Infinix Note 40 Pro 5G भारतात एकाच व्हेरिएंटमध्ये आणला गेला आहे. यात 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज आहे, ज्याची किंमत 21,999 रुपये आहे. त्याबरोबरच, आजपासून Flipkart वर फोनची अर्ली बर्ड सेलही सुरू झाली आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, या सेल अंतर्गत फोन खरेदी केल्यावर तुम्हाला 1000 रुपये किमतीचे Magcase आणि 3,999 रुपये किमतीचे MagPower देखील मोफत मिळेल. HDFC बँकेच्या कार्डवर 2000 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. मात्र, लक्षात घ्या की, ही ऑफर फक्त आजपर्यंत वैध आहे.
याव्यतिरिक्त, प्रो प्लस व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. हा फोन देखील एकाच व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 25 एप्रिलपासून सुरू होणार आहे.
Infinix Note 40 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, जो 120hz रिफ्रेश रेटसह येतो. तर फोनचा प्रो प्लस व्हेरिएंटमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे.
Infinix Note 40 Pro 5G हँडसेट Mediatek Dimensity 7020 प्रोसेसरसह येतो. तर, प्रो प्लस व्हेरिएंटमध्ये देखील MediaTek DIMENSITY 7020 प्रोसेसर उपलब्ध आहे.
Infinix Note 40 Pro 5G फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. यात 108MP मुख्य कॅमेरा, 2MP दुसरा आणि 2MP तिसरा सेन्सर OIS सपोर्टसह आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 32MP कॅमेरा उपलब्ध आहे.
याव्यतिरिक्त, Pro + हँडसेटमध्ये 108MP मुख्य, 2MP द्वितीय आणि 2MP तृतीय सेन्सर आहे. आकर्षक सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Infinix Note 40 Pro 5G या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर, Pro+ 5G व्हेरिएंट 4600mAh बॅटरीने सुसज्ज आहे.