Infinix Note 40 Pro 5G सिरीजची Sale आजपासून होणार सुरु, पहिल्या विक्रीत Best ऑफर्ससह खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन

Updated on 18-Apr-2024
HIGHLIGHTS

Infinix Note 40 Pro 5G सिरीज गेल्या आठवड्यात भारतात लाँच

नव्या सीरिजची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे.

स्मार्टफोन सिरीज अंतर्गत Infinix Note 40 Pro आणि Note 40 Pro Plus हे दोन स्मार्टफोन्स आहेत.

Infinix Note 40 Pro 5G सिरीज नुकतेच गेल्या आठवड्यात भारतात लाँच करण्यात आली आहे. त्यानंतर, आज म्हणजेच 18 एप्रिल रोजी या नव्या स्मार्टफोन सीरिजची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. मोठ्या सवलतीपासून ते मोफत MagCase पर्यंत, तुम्हाला या लाइनअपचे स्मार्टफोन मिळतील. या सिरीज अंतर्गत Infinix Note 40 Pro आणि Note 40 Pro Plus हे दोन स्मार्टफोन्स आहेत.

Infinix Note 40 Pro 5G Series

आम्ही तुम्हाला सांगतो की, सिरीजमधील स्मार्टफोन्सची अर्ली बर्ड सेल लाँच होताच सुरु झाली होती. या सेलमध्ये फोनला ग्राहकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला. हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाल्याचे कंपनीने X म्हणजेच ट्विटरवर पोस्ट शेअर करत सांगितले होते. आजपासून या फोनची खुली विक्री सुरु होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या स्मार्टफोन सिरीजवरील ऑफर्स-

Infinix Note 40 Pro 5G सिरीजवरील ऑफर्स

Infinix Note 40 Pro 5G ची किंमत 21,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या किमतीत 8GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे. तर, त्याचे अपग्रेड केलेले मॉडेल म्हणजेच Infinix Note 40 Pro Plus 24,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, मॅगकेस आणि मॅगपॉवर दोन्ही उपकरणांच्या खरेदीवर विनामूल्य उपलब्ध आहेत. HDFC बँक क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यास तुम्हाला 2,000 रुपयांची सूट मिळेल. दोन्हीवर नो-कॉस्ट EMI देखील दिला जाईल. येथून खरेदी करा

Infinix Note 40 Pro 5G सीरिजचे फीचर्स आणि स्पेक्स

डिस्प्ले

Infinix Note 40 Pro मध्ये 6.78 इंच फुल HD प्लस डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तर, Infinix Note 40 Pro Plus स्मार्टफोन 6.78 इंच लांबीच्या फुल HD प्लस कर्व डिस्प्लेसह येतो.

प्रोसेसर आणि स्टोरेज

Infinix Note 40 Pro मध्ये Mediatek Dimensity 7020 चिपसेट आहे. तसेच, फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. Infinix Note 40 Pro Plus मध्ये 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह MediaTek Dimensity 7020 प्रोसेसर आहे.

कॅमेरा

Note 40 Pro मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये पहिला OIS ला सपोर्ट करणारा 108MP लेन्स आहे, दुसरा आणि तिसरा 2MP सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

तर, Infinix Note 40 Pro Plus मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 108MP मुख्य सेन्सर आहे, तर इतर दोन 2MP लेन्स आहेत. त्याच वेळी, व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फी क्लिक करण्यासाठी डिव्हाइसच्या समोर 32MP कॅमेरा उपलब्ध आहे.

बॅटरी

Infinix Note 40 Pro 5G मध्ये एक मजबूत 5000mAh बॅटरी आहे, जी जलद चार्जिंगला सपोर्ट करते. तर, Infinix Note 40 Pro Plus मध्ये 4600mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :