Infinix Note 40 Pro सिरीजची भारतातील लाँच तारीख निश्चित करण्यात आली आहे. ही सिरीज काही काळापूर्वी जागतिक बाजारपेठेत दाखल झाली होती. त्यानंतरच, ही सिरीज लवकरच भारतात लाँच होईल, असे निश्चित करण्यात आले. मात्र, तेव्हा फोनच्या लाँच डेटची पुष्टी झाली नव्हती. मात्र, आता या फोनची भारतीय लाँच डेटही समोर आली आहे.
हे सुद्धा वाचा: Vodafone Idea चे Affordable प्लॅन्स! दीर्घकालीन वैधतेसह मिळेल Disney+ Hotstar चे सब्स्क्रिप्शन, बघा यादी। Tech News
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, जागतिक बाजारपेठेत कंपनीने Note 40 Pro+, Pro 5G, Note 40 Pro आणि Note 40 4G हे 4 मॉडेल सादर केले होते. मात्र, भारतात कंपनी या सिरीजमधील केवळ दोन फोन Infinix Note 40 Pro आणि Pro+ 5G लाँच करू शकते, असे बोलले जात आहे. चला तर मग बघुयात Infinix Note 40 Pro सिरीजचे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
कंपनीने Infinix India च्या अधिकृत X (Twitter) हँडलवर Infinix Note 40 Pro सिरीजच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. कंपनीने पोस्टमध्ये एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. या टीझर व्हिडीओच्या शेवटी सीरिजच्या लाँच डेटचा खुलासा करण्यात आला आहे.
होय, ही सिरीज भारतात 12 एप्रिल रोजी लाँच केली जाणार आहे. लाँच होताच फोनची प्री-ऑर्डर देखील सुरू केली जाईल. फोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. सिरीजसाठी समर्पित मायक्रोसाइट देखील Flipkart वर Live झाली आहे.
Flipkart मायक्रोसाईटनुसार, Infinix Note 40 Pro सीरिजमध्ये कर्व AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz असेल. ही सिरीज MediaTek Dimensity 7020 प्रोसेसरने सुसज्ज असेल. त्याबरोबरच, फोनमध्ये 12GB रॅम मिळू शकतो. या फोन्समध्ये Infinix X1 चीता चिप देखील दिली जाऊ शकते. Infinix Note 40 Pro सिरीजची अनेक फीचर्स फ्लिपकार्टवर लाईव्ह केलेल्या मायक्रोसाइटद्वारे लाँच होण्यापूर्वीच अधिकृत झाली आहेत.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. यामध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा आणि 32MP चा फ्रंट सेन्सर समाविष्ट केला जाईल. पॉवरचा फोनमध्ये 5000mAh बॅटरी असेल, ज्यामध्ये 100W वायर्ड आणि 20W वायरलेस चार्जिंग सपोर्ट असेल. या फोनमध्ये राउंड फास्टचार्ज 2.0 टेक्नॉलॉजी देखील दिली जाईल. फ्लिपकार्ट सूचीनुसार हा फोन ऑब्सिडियन ब्लॅक, टायटन गोल्ड आणि विंटेज ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल.