Infinix Note 40 5G ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! तुमच्या बजेटमध्ये असेल का किंमत? बघा सर्व लीक्स 

 Infinix Note 40 5G ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! तुमच्या बजेटमध्ये असेल का किंमत? बघा सर्व लीक्स 
HIGHLIGHTS

Infinix Note 40 5G पुढील आठवड्यात लाँच केला जाईल.

Infinix Note 40 5G ध्ये दोन 2MP लेन्ससह 108MP चा प्रायमरी लेन्स असण्याची शक्यता

आगामी हँडसेटची किंमत 15,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता

Infinix चे स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहेत. दरम्यान, कंपनीने आपल्या Note 40 सिरीजअंतर्गत नवीन 5G स्मार्टफोनच्या लाँचबद्दल पुष्टी केली आहे. होय, जारी झालेल्या टीझर पोस्टरनुसार, Infinix Note 40 5G पुढील आठवड्यात लाँच केला जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन आधीच जागतिक बाजारपेठेत लाँच झाला आहे. चला तर मग जाणून घेऊयात Infinix Note 40 5G चे भारतीय लॉन्चिंग-

Also Read: Jio ची सर्वात मोठी घोषणा! कनेक्शन एक आणि तब्बल 120 उपकरणांवर चालले इंटरनेट, वाचा डिटेल्स

Infinix Note 40 5G भारतीय लॉन्चिंग

Infinix च्या मते आणि सर्व ऑनलाईन पुढे आलेल्या सर्व अहवालानुसार Infinix Note 40 5G फोन भारतीय बाजारात 21 जून 2024 रोजी लाँच होईल. Infinix ने अद्याप किंमतीबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही, परंतु लीक आणि रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की, आगामी हँडसेटची किंमत 15,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान ठेवली जाण्याची शक्यता आहे.

Infinix Note 40 Pro+ 5G launched 2024
Infinix Note 40 Pro+ 5G launched 2024

Infinix Note 40 5G च्या आगमनाने Xiaomi, Realme आणि Oppo सारख्या कंपन्यांच्या मोबाईल फोनना भारतीय बाजारपेठेत जोरदार स्पर्धेला सामोरे जावे लागेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे बजेट श्रेणीमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढेल.

Infinix Note 40 5G बद्दल सर्व लीक्स

अलिडकेच पुढे आलेल्या अहवालानुसार, असे सांगितले जात आहे की, भारतात फक्त फिलिपिन्स Infinix Note 40 5G व्हेरिएंट लाँच केला जाईल. लीकनुसार, या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळेल. यासह चांगल्या परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 7020 प्रोसेसर देण्यात येईल. हा फोन Android 14 वर कार्य करेल.

फोटोग्राफीसाठी, Infinix Note 40 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या फोनमध्ये दोन 2MP लेन्ससह 108MP चा प्रायमरी लेन्स असण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP कॅमेरा देण्यात येईल. फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, स्पीकर ग्रिल, ड्युअल सिम स्लॉट आणि USB टाइप-C पोर्ट असण्याची शकयता आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo