Infinix Note 30 5G Vs Tecno Camon 20 5G: 15 हजार रुपयांअंतर्गत कोणता फोन आहे बेस्ट?

Infinix Note 30 5G Vs Tecno Camon 20 5G: 15 हजार रुपयांअंतर्गत कोणता फोन आहे बेस्ट?
HIGHLIGHTS

Infinix Note 30 5G आणि Tecno Camon 20 5G च्या स्पेक्सची तुलना

दोन्ही स्मार्टफोनची किंमत 15 हजार रुपयांच्या आत आहे.

फोनच्या बॅक पॅनलवर AI टेक्नॉलॉजीसह 108-मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर उपलब्ध

Infinix Note 30 5G Vs Tecno Camon 20 5G: अलीकडेच मार्केटमध्ये दोन नवीन बजेट रेंज स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. दोन्ही स्मार्टफोनची किंमत 15 हजार रुपयांच्या आत आहे. Infinix Note 30 5G आणि Tecno Camon 20 5G असे हे दोन फोन समान किंमत श्रेणीमध्ये लाँच करण्यात आले आहेत. तर, या दोन्ही फोन्समधून तुमच्यासाठी कोणता फोन योग्य ठरेल? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी बघुयात दोन्ही फोन्सचे स्पेसीफिकेशन्स. 

Infinix Note 30 5G Vs Tecno Camon 20 5G

किंमत 

Infinix Note 30 5G च्या बेस मॉडेलमध्ये 4GB रॅमसह 128GB स्टोरेज आहे, ज्याची किंमत 14,999 रुपये आहे. तर, Tecno Camon 20 ची किंमत भारतात 14,999 रुपये आहे आणि हा फोन एकाच 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसह येतो.

डिस्प्ले 

Infinix Note 30 5G फोनमध्ये मोठी 6.78-इंच लांबीची स्क्रीन आहे, यासह डिस्प्लेवर 120Hz रिफ्रेश रेट आहे. हे Infinix Mobile Eyecare मोडला देखील सपोर्ट करते. तर,  Tecno Camon 20 5G मध्ये 6.67-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो. 

परफॉर्मन्स 

Infinix Note 30 5G फोन MediaTek Dimensity 6080 octa-core प्रोसेसरवर चालतो. तर, Tecno Camon 20 मध्ये प्रोसेसिंगसाठी MediaTek Helio G85 octa-core आहे.

बॅटरी 

 Infinix Note 30 5G मध्ये 45W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 10,000 पेक्षा जास्त वेळा चार्ज करता येईल, असा दावा कंपनीने केला आहे. तर, Tecno Camon 20 5G स्मार्टफोनमध्ये सुद्धा 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

कॅमेरा 

Infinix Note 30 5G मध्ये फोनच्या बॅक पॅनलवर AI टेक्नॉलॉजीसह 108-मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर दिलेला आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा मिळेल.

तर, Tecno Camon 20 मध्ये AI सेन्सर आणि क्वाड-LED रिंग फ्लॅशसह 64MP प्रायमरी लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. तसेच, स्मार्टफोनमध्ये f/2.45 अपर्चर आणि ड्युअल LED फ्लॅशसह 32MP सेल्फी कॅमेरा मिळतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo