Infinix Note 30 5G Offers: लेटेस्ट स्मार्टफोनची विक्री आजपासून सुरु, पहिल्याच दिवशी भारी डिस्काउंट

Updated on 26-Jun-2023
HIGHLIGHTS

स्मार्टफोनची विक्री आजपासून म्हणजेच 22 जून रोजी दुपारी 12 वाजता भारतात सुरू होईल.

नव्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 14,999 रुपये

ग्राहकांना Axis बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1,000 रुपयांची सूट मिळेल.

 Infinix Note 30 5G Offers:  Infinix Note 30 5G स्मार्टफोन नुकताच भारतात लाँच करण्यात आला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन आहे. लाँच झाल्यानंतर या स्मार्टफोनची बरीच चर्चा झाली होती. फोनमध्ये कमी किमतीत उत्तमपेक्षा उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोनची विक्री आजपासून म्हणजेच 22 जून रोजी दुपारी 12 वाजता भारतात सुरू होईल. हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. त्याबरोबरच, पहिल्या सेलमध्ये ऑफर्स देखील मिळणार आहेत. 

Infinix Note 30 5G ची किंमत

 Infinix Note 30 5G हा डिवाइस कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज बेस व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत 14,999 रुपये आहे. तर, 8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे.

Infinix Note 30 5G वरील ऑफर्स

Infinix Note 30 5G वर पहिल्या सेलमध्ये ग्राहकांना बरेच ऑफर्स मिळणार आहेत. ग्राहकांना Axis बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1,000 रुपयांची सूट मिळेल. फोनमध्ये इंटरस्टेलर ब्लू, मॅजिक ब्लॅक आणि सनसेट गोल्ड असे तीन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

Infinix Note 30 5G चे मुख्य तपशील

Infinix Note 30 5G स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आहे. विशेष म्हणजे फोनमध्ये आय-केअर मोड उपलब्ध आहे. याशिवाय, फोन MediaTek Dimensity 6080 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगसह येईल.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 108MP आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP कॅमेरा मिळेल. त्याबरोबरच, यात प्रो मोड, अल्ट्रा क्लियर डेलाइट फोटोग्राफी, सुपर नाईट मोड आणि व्हिडिओ पोर्ट्रेट मोड आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :