Infinix Note 30 5G भारतात लाँच, बजेट किमतीत मिळेल 108MP कॅमेरा

Updated on 26-Jun-2023
HIGHLIGHTS

कंपनीने Infinix Note 30 5G स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे.

बेस व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे.

फोनमध्ये आय-केअर मोड उपलब्ध आहे.

Infinix Note 30 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आधीच सूचीबद्ध करण्यात आला होता. मात्र, लाँचनंतर कंपनीने फोनबद्दल सविस्तर माहिती उघड केली आहे. फोनची सेल 22 जून 2023 रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरू होईल. 

Infinix Note 30 5G ची भारतीय किंमत

 

https://twitter.com/InfinixIndia/status/1668875744943181824?ref_src=twsrc%5Etfw

 

कंपनीने Infinix Note 30 5G स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. 4GB रॅमसह 128GB स्टोरेज बेस व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. तर, टॉप मॉडेल 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 15,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डवर 1000 रुपयांपर्यंत सूट  उपलब्ध आहे. फोन इंटरस्टेलर ब्लू, मॅजिक ब्लॅक आणि सनसेट गोल्ड या तीन कलर ऑप्शनमध्ये येईल.   

Infinix Note 30 5G

Infinix Note 30 5G स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. विशेष म्हणजे, फोनमध्ये आय-केअर मोड उपलब्ध आहे. हा हँडसेट MediaTek Dimensity 6080 प्रोसेसरसह येतो. स्मार्टफोनमध्ये 8GB व्हर्चुअल रॅमचा पर्याय आणि 256GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने सहज वाढवता येईल.

याशिवाय, कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 108MP चा मुख्य कॅमेरा उपलब्ध आहे. यासह 2MP चा दुसरा सेन्सर आणि AI लेन्स देखील उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी यात प्रो मोड, अल्ट्रा क्लियर डेलाइट फोटोग्राफी, सुपर नाईट मोड आणि व्हिडिओ पोर्ट्रेट मोड उपलब्ध आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 16MP कॅमेरा देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :