बजेट किमतीत येणार Infinix Note 30 5G, 108MP कॅमेरासह लवकरच होणार लाँच

बजेट किमतीत येणार Infinix Note 30 5G, 108MP कॅमेरासह लवकरच होणार लाँच
HIGHLIGHTS

14 जून रोजी भारतात लाँच होणाऱ्या Infinix Note 30 5G चे संपूर्ण लिक्स जाणून घ्या

हा फोन लोअर मिड बजेट रेंजमध्ये सादर करण्यात येणार आहे.

लॉन्च झाल्यानंतर तिसर्‍या आठवड्यात फोनची विक्री फ्लिपकार्टवर सुरू करण्यात येईल,

Infinix Note 30 5G भारतात लवकरच म्हणजे 14 जून रोजी लाँच होणार आहे. कंपनीकडून फोनच्या प्रोडक्ट पेजच्या माध्यमातून डिझाईन आणि अनेक फीचर्सची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान लाँच आधीच बातमी समोर आली आहे की, Infinix Note 30 5G फोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात येणार आहे. म्हणजेच, हा फोन बजेट किमतीत लाँच करण्यात येईल. 

Infinix Note 30 5G बद्दल लीक्स 

 

 

 Infinix Note 30 5G हा लोअर मिड-बजेट स्मार्टफोन असेल ज्याची किंमत 15 हजारांपेक्षा कमी असेल, असे कंपनीने सांगितले आहे. ही फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत देखील असण्याची शक्यता आहे. 14 जून रोजी भारतात लॉन्च झाल्यानंतर तिसर्‍या आठवड्यात फोनची विक्री फ्लिपकार्टवर सुरू करण्यात येईल, असे देखील सांगण्यात आले आहे. 

संभावित फीचर्स आणि स्पेक्स 

फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा पंच-होल डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. फोन MediaTek Dimensity 6080 Octacore प्रोसेसरवर कार्य करेल. मागील कॅमेरा सेटअपमध्ये F/1.75 अपर्चरसह 108MP Samsung ISOCELL HM6 सेन्सर, 2MP लेन्स आणि AI सेन्सर समाविष्ट असण्याची शक्यता आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेराला सपोर्ट करेल.

याव्यतिरिक्त, बॅटरी बद्दल बोलायचे झाल्यास, फोनला पॉवर देण्यासाठी 500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 45W फास्ट चार्जिंग समर्थनासह येते. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo