Infinix चा नवीन बजेट स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स…
Infinix Note 12i बजेट स्मार्टफोन भारतात लाँच
नव्या स्मार्टफोनची किंमत फक्त 9,999 रुपये
Infinix Note 12i मध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
स्मार्टफोन निर्माता Infinix ने Infinix Note 12i भारतीय बाजारात आज लाँच केला आहे. कंपनीचे Note लाइनअपमधील नवीन स्मार्टफोन MediaTek Helio G85 SoC सह सुसज्ज आहे. यात 4GB रॅम आणि 64GB इनबिल्ट स्टोरेज आहे. तसेच, यात 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा आहे. तर, समोर ड्युअल LED फ्लॅशसह 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Infinix Note 12i मध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हे सुद्धा वाचा : भारीच की ! Googleचा 'हा' फोन फक्त 9000 रुपयांत खरेदी करण्याची संधी
Infinix Note 12i चे स्पेसिफिकेशन्स
Infinix Note 12i मध्ये फुल HD+ रिझोल्यूशनसह 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले, 60Hz रिफ्रेश रेट आणि 1000 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity G85 SoC आहे, ज्यासोबत Mali G52 GPU आहे. स्टोरेजसाठी, यात 4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेज आहे. जे मायक्रो SD कार्डने 512GB पर्यंत वाढवता येते.
ऑपरेटिंग सिस्टमसाठी, हा Infinix फोन Android 12 वर आधारित XOS 12 वर काम करतो. यात पहिला कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, तर दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. समोर 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, डीटीएस ऑडिओ सपोर्टसह स्टिरिओ स्पीकर, ब्लूटूथ 5.0 आणि 3 जीबी व्हर्च्युअल रॅम आहे.
किंमत :
Infinix Note 12i ची किंमत फक्त 9,999 रुपये आहे. या फोनची विक्री 30 जानेवारीपासून ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. हा फोन Metaverse Blue आणि Force Black पर्यायांमध्ये येतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile