हँडसेट निर्माता Infinix आपला नवीन स्मार्टफोन Infinix Note 12i 2022 भारतीय बाजारपेठेत उद्या म्हणजेच 25 जानेवारी रोजी ग्राहकांसाठी लाँच करणार आहे. अधिकृत लाँच आधी, कंपनीने एक प्रेस रिलीज जारी करून त्याच्या आगामी स्मार्टफोनची किंमत उघड केली आहे. या डिव्हाइसमध्ये तुम्हाला 33W फास्ट चार्ज सपोर्टसह 180Hz टच सॅम्पलिंग रेट सारखी फीचर्स पाहायला मिळतील.
हे सुद्धा वाचा : OTT This Week: या आठवड्यात रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि सिरीजची यादी बघा…
केवळ किंमतच नाही तर कंपनीने या Infinix स्मार्टफोनसोबत उपलब्ध असलेल्या ऑफरचे अनावरणही केले आहे, कंपनीचे म्हणणे आहे की ग्राहकांना या हँडसेटसोबत Jio ऑफर मिळेल.
फोनमध्ये 1000 nits पीक ब्राइटनेससह 6.7-इंचाचा फुल-एचडी प्लस AMOLED डिस्प्ले मिळेल. हा नवीनतम फोन Android 12 वर आधारित XOS 12 वर काम करेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या Infinix मोबाईल फोनमध्ये MediaTek Helio G85 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 4 GB रॅम मिळेल, जो 3 GB व्हर्च्युअल रॅम सपोर्टच्या मदतीने 7 GB पर्यंत वाढवता येईल. याशिवाय थर्मल मॅनेजमेंटसाठी 10 लेयर कुलिंग सिस्टीम देण्यात आली आहे.
त्याबरोबरच, यात 5000 mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्ज सपोर्टच्या मदतीने पटकन चार्ज होईल. 50-मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा सेन्सरसह फोनच्या मागील पॅनलवर डेप्थ कॅमेरा सेन्सर आणि AI लेन्स उपलब्ध असतील. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील भागात 8-मेगापिक्सल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.
या Infinix मोबाईल फोनच्या किंमतीबाबत कंपनीने सांगितले की, भारतीय बाजारात या उपकरणाची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. पण सध्या कंपनीने या हँडसेटची नेमकी किंमत जाहीर केलेली नाही, उद्या लॉन्च इव्हेंट दरम्यान यावरून पडदा उठणार आहे.