Infinix ने आपला नवीन स्मार्टफोन Infinix Note 12 Pro भारतात लाँच केला आहे. नोट 12, नोट 12 टर्बो, नोट 12 प्रो 5G आणि नोट 12 5G नंतर नोट 12 सिरीजमधील हे पाचवे डिव्हाइस आहे. नवीन Infinix Note 12 Pro फोन MediaTek च्या नवीन बजेट चिपसेटसह भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. डिव्हाइस MediaTek Helio G99 चिपने सुसज्ज आहे. जाणून घेऊयात नवीन फोनची किंमत आणि विशेष फीचर्स…
हे सुद्धा वाचा : 14,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत Redmi Note 11 SE लाँच, मिळेल 64MP कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग बॅटरी
Infinix Note 12 Pro 4G मध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर आहे. Note 12 Pro मध्ये 60Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह 6.7-इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे. Note 12 Pro 256GB स्टोरेजसह येईल. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर डिव्हाइस 108MP मेन कॅमेरा, एक डेप्थ सेन्सर आणि AI लेन्ससह येईल. आकर्षक सेल्फीसाठी फ्रंटला 16MP सेल्फी स्नॅपर आहे.
Infinix Note 12 Pro मध्ये 5000mAh बॅटरी आहे आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन XOS 10.6 स्किनसह Android 12 वर चालतो. इतर फीचर्समध्ये 7.8 मिमी जाडी, 5 GB व्हर्च्युअल रॅम, 4 D व्हायब्रेशन, 3.5 मिमी हेडफोन जॅक, USB टाइप-C पोर्ट, ड्युअल-बँड Wi-Fi आणि ब्लूटूथ यांचा समावेश आहे.
भारतात Infinix Note 12 Pro 8GB RAM आणि 256GB इंटर्नल स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. स्मार्टफोन व्हाईट, ब्लू आणि ग्रे कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल . हे उपकरण भारतात 1 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. पहिल्या विक्रीदरम्यान खरेदीदार डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 1,500 रुपयांची सूट घेऊ शकतात.