Infinix Note 12 5G सिरीज भारतात 8 जुलै रोजी लॉन्च होईल, अशी माहिती मिळाली आहे. या सिरीजमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच, एक AMOLED डिस्प्ले देखील दिला जाण्याची अपेक्षा आहे. या फोनची विक्री ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर होणार आहे. या सीरीज अंतर्गत Infinix Note 12 5G आणि Note 12 Pro 5G स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात. या सिरीजची टॅगलाइन 'थ्रिल अँड थंडर' ठेवण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : Airtel कडून 4 अप्रतिम प्लॅन्स लाँच! 30 दिवसांच्या वैधतेसह मिळतील अनेक लाभ, किंमत 140 रुपयांपेक्षा कमी
Infinix Note 12 5G ची किंमत सुमारे 15,000 रुपये असण्याची शक्यता आहे. हे उपकरण देशात फ्लिपकार्टद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल.
Infinix ने आपल्या ट्विटर हँडलवरून सांगितले की, हा फोन भारतात 8 जुलै रोजी लाँच केला जाईल. फ्लिपकार्टवर या सिरीजसाठी एक डेडिकेटेड मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे. Infinix 12 Pro 5G बद्दल बोलायचे झाले तर, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. तसेच, यामध्ये 108-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देखील दिला जाऊ शकतो. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसह 6.7-इंच फुल-HD+ एमोलेड डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. हा 5G हँडसेट आहे.
याव्यतिरिक्त, फोनमध्ये आकर्षक सेल्फीसाठी 16 MP चा फ्रंट शुटर देण्यात आला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये USB-C पोर्ट देण्यात आला आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.