Infinix Note 12 (2023) स्मार्टफोन 50MP कॅमेरासह लाँच, तुमच्या बजेटमध्ये आहे किमंत
Infinix Note 12 (2023) स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच
या फोनची किंमत जवळपास 16,500 रुपये
डिव्हाइसमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, मायक्रो SD कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवता येते.
टेक कंपनी Infinix ने नवीन स्मार्टफोन Infinix Note 12 (2023) लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मोठा डिस्प्ले आणि दमदार कॅमेरा व्यतिरिक्त पावरफुल MediaTek चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आहे, जी इंटर्नल स्टोरेज वापरून 13GB पर्यंत वाढवता येते.
हे सुद्धा वाचा : Flipkartने लाँच केला Flipverse! ऑनलाईन शॉपिंग होईल अजूनच मजेशीर, वाचा डिटेल्स
Infinix Note 12 (2023)
स्मार्टफोनमध्ये फुल HD + 1080X2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. Infinix Note 12 (2023) मध्ये MediaTek Helio G99 चिपसेट आणि Mali-G57 GPU दिले गेले आहेत. या स्मार्टफोनमध्ये Android 12 वर आधारित XOS 10.6 सॉफ्टवेअर स्किन देण्यात आली आहे.
डिव्हाइसमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोनमध्ये 8GB रॅम असून 256GB पर्यंत स्टोरेज आहे, जे मायक्रो SD कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवता येते. या डिव्हाइसमध्ये 3.5mm हेडफोन जॅक आणि USB टाइप-C कनेक्टिव्हिटी आहे.
याव्यतिरिक्त, कॅमेरा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये मागील पॅनलवर 50MP प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. मुख्य सेन्सर व्यतिरिक्त, यात 2MP डेप्थ सेन्सर आणि AI लेन्स आहे. लो- लाइटमधील चांगल्या परफॉर्मन्ससाठी, यात सुपर नाईट मोड देण्यात आला आहे. फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल.
Infinix Note 12 (2023) किंमत
नवीन Infinix Note 12 (2023) स्मार्टफोनची किंमत $199 जवळपास 16,500 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत डिव्हाइसच्या फक्त 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. हे उपकरण अल्पाइन व्हाइट, टस्कनी ब्लू आणि व्होल्कॅनिक ग्रे कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल. मात्र, कंपनीने हा फोन भारतीय बाजारात लाँच करण्याची अद्याप घोषणा केलेली नाही. या वर्षाच्या अखेरीस हा फोन भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile