Infinix च्या लेटेस्ट स्मार्टफोन Infinix Hot 50 5G च्या भारतीय लाँचची चर्चा बरेच दिवसांपासून सुरु होती. आता अखेर कंपनीने नवा Infinix Hot 50 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या बजेट फोनमध्ये कंपनीने अनेक पॉवरफुल फीचर्स दिले आहेत. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी फोनला IP54 रेटिंग मिळाले आहे. चला तर मग जाणून घेऊयात Infinix Hot 50 5G ची किंमत आणि सर्व तपशील-
Also Read: वॉटरप्रूफ आणि मजबूत बॉडीसह येणाऱ्या OPPO F27 सिरीजच्या स्मार्टफोन्सवर भारी Discount, पहा ऑफर
Infinix Hot 50 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. या फोनच्या बेस वेरिएंटमध्ये 4GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज आहे, ज्याची किंमत 9,999 रुपये आहे. तर, या फोनच्या टॉप वेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज आहे, जो 10,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. फोनची पहिली विक्री 9 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा फोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. पहिल्या सेलमध्ये, Axis Bank कार्ड्सवर 1000 रुपयांची सूट उपलब्ध आहे.
Infinix Hot 50 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Mediatek Dimensity 6300 प्रोसेसर सह येतो. हा फोन Android 14 वर आधारित XOS 14.5 वर चालतो. वर सांगितल्याप्रमाणे, फोनमध्ये 8GB रॅम आणि B128GB इंटरनल स्टोरेज आहे. हँडसेटमध्ये मायक्रो SD कार्ड आहे, ज्याच्या मदतीने ते 1TB पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी Infinix Hot 50 5G फोनच्या मागील बाजूस 48MP मुख्य कॅमेरा आणि डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C चार्जिंग पोर्ट आहे.