बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला Infinix Hot 40i स्मार्टफोन आज भारतीय बाजारात लाँच झाला आहे. फोन फक्त एका रॅम व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. हा फोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. होय, कंपनीने आणखी एक फोन बजेट विभागात लाँच केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन चार कलर ऑप्शनमध्ये आणला आहे. चला तर मग जाणून घेऊयात कमी किमतीत उत्कृष्ट फीचर्ससह या फोनची किंमत आणि सर्व फीचर्स-
हे सुद्धा वाचा: 6000mAh बॅटरीसह येणारा Samsung Galaxy M34 5G फोन 3000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News
Infinix Hot 40i स्मार्टफोन 9,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. हा फोन Horizon Gold, Palm Blue, Starfall Green आणि Starlit Black चार कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनची विक्री 21 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर सुरू होईल. पहिल्या सेलदरम्यान तुम्हाला तुमच्या फोनवर 1000 रुपयांचा एक्सचेंज ऑफ मिळेल.
स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच लांबीचा HD+ IPS डिस्प्ले आहे, ज्याचा टच सॅम्पलिंग रेट 180Hz आणि रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. या फोनमध्ये Unisoc T606 Octa Core प्रोसेसर आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा हँडसेट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते. तसेच, या फोनची रॅम 8GB ने वाढवण्याचा पर्याय देखील आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP AI कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 32MP कॅमेरा उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह येतो. तसेच, हा फोन Android 13 वर आधारित XOS 13 वर चालतो. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या Infinix फोनमध्ये ब्लूटूथ आणि Wi-Fi सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.