लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Infinix HOT 40i ची भारतात विक्री सुरु, पहिल्या सेलमध्ये मिळतोय मोठा Discount। Tech News

Updated on 21-Feb-2024
HIGHLIGHTS

Infinix HOT 40i ची भारतात पहिली विक्री आजपासून सुरु

Infinix Hot 40i स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे.

या स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 Octa Core प्रोसेसर आहे.

Infinix HOT 40i ची भारतात पहिली विक्री आज म्हणजेच 21 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजल्यापासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर लाईव्ह होईल. या कालावधीत तुम्हाला स्मार्टफोन खरेदीवर उत्तम ऑफर आणि डील्स मिळत आहेत. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये iPhone मध्ये असणाऱ्या डायनॅमिक आयलंड सारखा फीचर मिळेल. मुख्य म्हणजे या बजेट स्मार्टफोनमध्ये यात HD डिस्प्ले आणि AI कॅमेरा आहे. जाणून घेऊयात Infinix HOT 40i ची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-

Infinix HOT 40i ची किंमत आणि ऑफर्स

Infinix ने Hot 40i स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये इतकी निश्चित केली आहे. या किंमतीत 8GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला OneCard क्रेडिट कार्ड वापरून खरेदीवर 750 रुपयांची सूट मिळेल. त्याबरोबरच, HDFC, ICICI आणि SBI बँका त्यांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना 1000 रुपयांची सूट देत आहेत.

Infinix Hot 40i launched

याव्यतिरिक्त, Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून 5% कॅशबॅक मिळत आहे. Infinix चा नवीन स्मार्टफोन Flipkart वरून 1,667 रुपये प्रति महिना NO-COST EMI वर खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन Horizon Gold, Palm Blue, Starfall Green आणि Starlit Black कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Infinix HOT 40i चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Infinix Hot 40i मध्ये 6.6 इंच लांबीचा HD + IPS डिस्प्ले आहे, ज्याचा टच सॅम्पलिंग रेट 180Hz आणि रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. या स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 Octa Core प्रोसेसर आहे. त्याबरोबरच, 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळेल, फोनची स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक फीचर उपलब्ध आहे.

#Infinix-HOT-40i

हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. पहिला एक 50MP लेन्स आहे आणि दुसरा AI सेन्सर आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32MP कॅमेरा उपलब्ध आहे. यामध्ये लाईव्ह, पोर्ट्रेट आणि नाईट असे कॅमेरा मोड उपलब्ध आहेत. Infinix ने या मोबाईल मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. फोनमध्ये उपलब्ध इतर स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हँडसेटमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :