Infinix Hot 30i बजेट सेगमेंटमधील आणखी एक स्मार्टफोन भारतात लाँच
हा फोन 3 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.
फोनमध्ये 50 मेगापिक्सल्सचा पहिला सेन्सर आहे.
Infinix Hot 30i बजेट सेगमेंटमधील आणखी एक स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. नवीन फोन कंपनीच्या हॉट सीरीज अंतर्गत सादर करण्यात आले आहे. यात MediaTek G37 प्रोसेसर आणि 8 GB रॅम देण्यात आली आहे. तसेच 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 10 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. चला जाणून घेऊयात त्याचे जबरदस्त फीचर्स-
Infinix HOT 30i ची किंमत आणि उपलब्धता
या फोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजची किंमत 8,999 रुपये आहे. हा फोन 3 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल. हे ग्लेशियर ब्लू आणि मिरर ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येईल.
Infinix Hot 30i
या फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले आहे. हा फोन 90 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह येतो. यात पांडा ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे. हा फोन ऑक्टा-कोर 6nm MediaTek Helio G37 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 8GB रॅम देण्यात आली आहे. हे 16 GB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन Android 12 वर काम करतो.
कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G LTE, USB Type-C पोर्ट, Bluetooth, OTG आणि Wi-Fi सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये फोन अनलॉक फीचर देण्यात आले आहे. तसेच, 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे आणि 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
त्याबरोबरच, फोनमध्ये 50 मेगापिक्सल्सचा पहिला सेन्सर आणि दुसरा एआय लेन्स आहे. फोनमध्ये 5 मेगापिक्सल्सचा फ्रंट सेन्सर आहे. फोनमध्ये 128 GB स्टोरेज आहे. हे मायक्रो SD कार्डद्वारे 1 TB पर्यंत वाढवता येते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.