6000mAh बॅटरी आणि 6.82 इंच डिस्प्लेसह INFINIX स्वस्त फोन लाँच, बघा जबरदस्त फीचर्स
Infinix Hot 20 Play स्वस्त स्मार्टफोन लाँच
स्मार्टफोनमध्ये पंच-होल डिझाइनसह HD + डिस्प्ले मिळेल.
18W फास्ट चार्जिंगसाठी समर्थन असलेले 6000mAh बॅटरी हे डिव्हाइसचे सर्वात मोठे फिचर
टेक कंपनी Infinix ने आपल्या Hot 20 लाइनअप मध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. आता लाँच झालेल्या Infinix Hot 20 Play मध्ये मजबूत फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये पंच-होल डिझाइनसह HD + डिस्प्ले देण्यात आला आहे. MediaTek प्रोसेसर व्यतिरिक्त, 13MP ड्युअल कॅमेरा आणि मजबूत बॅकअप असलेली मोठी बॅटरी नवीन उपकरणाच्या प्रमुख फीचर्समध्ये देण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : मोफतमध्ये Disney+ Hotstar सब्स्क्रिप्शन हवा? 'या' प्लॅनसह Jio, Airtel आणि Vi वापरकर्त्यांनी रिचार्ज करा
Infinix Hot 20 Play चे स्पेसिफिकेशन्स
नवीन Infinix फोनमध्ये 6.82-इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले आहे, जो HD + 1640×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. Android 12 वर आधारित कंपनीचा XOS UI सॉफ्टवेअर म्हणून डिव्हाइसमध्ये उपलब्ध आहे. डिव्हाइसमध्ये MediaTek Helio G37 चिपसेट देण्यात आला आहे आणि 4GB रॅम सपोर्ट करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 64GB आणि 128GB स्टोरेज वेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यासोबतच मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.
कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या मागील पॅनलवर 13MP प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे आणि इतर AI लेन्स देखील उपलब्ध आहेत. तर, फ्रंट पॅनलवर 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ड्युअल स्पीकर व्यतिरिक्त या डिवाइसमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देखील मिळतो.
18W जलद चार्जिंगसाठी समर्थन असलेली 6000mAh बॅटरी हे डिव्हाइसचे सर्वात मोठे फिचर आहे. कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये हे डिव्हाइस रेसिंग ब्लॅक, लुना ब्लू, अरोरा ग्रीन आणि फॅन्टसी पर्पल या चार कलर पर्यायांमध्ये आणले आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile