Infinix अतिशय स्वस्त 5G फोन लाँच, मिळेल 7GB RAM आणि किंमत 15 हजारांपेक्षा कमी

Updated on 10-Oct-2022
HIGHLIGHTS

Infinix Hot 20 5G नवीनतम स्मार्टफोन लाँच

नवीनतम स्मार्टफोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी

या फोनमध्ये एकूण 7GB रॅम मिळेल.

स्वस्त फोन निर्माता Infinix ने Infinix Hot 20 5G हा स्वस्त आणि मजबूत 5G फोन म्हणून लाँच केला आहे. हे कंपनीचे पहिले 5G-रेडी हॉट-ब्रँडेड मॉडेल आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तुम्हाला या 5G फोनमध्ये 15 हजार रुपयांच्या आत एकूण 7GB रॅम मिळेल. फोनच्या इतर खास फीचर्समध्ये 120Hz डिस्प्ले, डायमेन्सिटी 8-सिरीज चिप आणि 50-मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा यांचा समावेश आहे. या फोनमध्ये काय खास आहे आणि त्याची किंमत किती आहे हे जाणून घेऊयात…  

हे सुद्धा वाचा : TIPS : लॅपटॉप जलद गरम होण्याच्या समस्येने तुम्ही हैराण झालात? करा फक्त 'हे' काम

किंमत आणि उपलब्धता

 Infinix Hot 20 ची किंमत 179 युरो म्हणजेच सुमारे 14,425 रुपये आहे. फोन रेसिंग ब्लॅक, स्पेस ब्लू आणि ब्लास्टर ग्रीन या तीन कलर्समध्ये येतो. 

Infinix Hot 20 5G

Infinix Hot 20 5G मध्ये 6.6-इंच लांबीचा IPS LCD पॅनेल आहे, जो फुल HD+ रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट देतो. फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे. फोन डायमेंशन 810 चिपने सुसज्ज आहे, जो 5G कनेक्टिव्हिटीसाठी सपोर्ट आणतो. चिप सोबत 4GB RAM, 3GB व्हर्च्युअल रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज आहे. यात 18W चार्जिंग सपोर्ट आणि 5W रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे.

याव्यतिरिक्त फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा Samsung JN1 मेन कॅमेरा आणि डेप्थ सेन्सर आहे. यात 8-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग स्नॅपर आहे. हँडसेट सुपर नाईट मोड, सुपर नाईट फिल्टर, पोर्ट्रेट मोड, शॉर्ट-व्हिडिओ मोड आणि आय-ट्रॅकिंग सारखी फोटोग्राफी फीचर्स देतो. फोन ड्युअल सिम, 5G, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ 5.1, GPS, NFC, 3.5mm ऑडिओ जॅक आणि USB-C पोर्ट, इतर फीचर्ससह ऑफर करतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :