Infinix ने लाँच ₹ 10,400 किमतीचा मस्त फोन, आकर्षक लुकसह मिळतील जबरदस्त फीचर्स

Updated on 13-Oct-2022
HIGHLIGHTS

Infinix Hot 20 4G नवीन फोन मार्केटमध्ये लाँच

या फोनची सुरुवातीची अंदाजे 10,400 रुपये.

डिव्हाइस 4GB आणि 6GB रॅम व्हेरिएंटमध्ये येतो.

Infinix आपला स्मार्टफोन पोर्टफोलिओ झपाट्याने वाढवत आहे. अलीकडे, ब्रँडने Hot 20 5G, Hot 20s आणि Hot 20i सारखे काही Hot 20 सिरीज स्मार्टफोन लॉन्च केले. त्यानंतर, आता कंपनीने Infinix Hot 20 4G नावाचे आणखी एक Hot 20-ब्रँडेड मॉडेल लाँच केले आहे. बघुयात सविस्तर माहिती… 

हे सुद्धा वाचा : 11.2-इंच डिस्प्लेसह Lenovoचा नवीन पावरफुल टॅब लाँच, तुमच्या बजेटमध्ये आहे किंमत

Infinix Hot 20 4Gची किंमत

फोन थायलंडमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीच्या 4GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत THB 4,799 म्हणजेच अंदाजे रुपये 10,400 आहे.  तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 5,399 THB म्हणजेच अंदाजे रुपये 11,700 आहे. हँडसेट सोनिक ब्लॅक, लेजेंड व्हाइट, टेम्पो ब्लू आणि फॅन्टसी पर्पल रंगांमध्ये येतो.

Infinix Hot 20 4G

Infinix Hot 20 मध्ये सेल्फी कॅमेरासाठी पंच होल कटआउटसह मोठा 6.82-इंच लांबीचा IPS LCD पॅनेल आहे. हे 720×1640 पिक्सेलचे HD+ रिझोल्यूशनसह येईल. स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला देखील सपोर्ट करते. Hot 20 MediaTek Helio G85 चिपसेटने सुसज्ज आहे. यात 5000mAh बॅटरी आहे, जी USB-C द्वारे 18W चार्जिंगला सपोर्ट करते. डिव्हाइस 4GB आणि 6GB रॅम व्हेरिएंटमध्ये येतो. दोन्ही मॉडेल 128GB इनबिल्ट स्टोरेज देतात. Hot 20 Android 12 OS वर आधारित XOS 10.6 वर चालतो. एक्सट्रा स्टोरेज मायक्रो SD कार्डने वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी यात 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाइसच्या मागील पॅनेलमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, AI लेन्स आणि LED फ्लॅश युनिट आहे. हे फेस अनलॉक आणि साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर सारख्या सिक्योरिटी फीचर्ससह येते. डिव्हाइसवर उपलब्ध असलेल्या इतर फीचर्समध्ये ड्युअल स्पीकर, ड्युअल सिम, 4G, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ 5.0, GPS आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक यांचा समावेश आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :