Infinix ने 2 ऑगस्ट रोजी भारतात त्यांच्या Hot 12 सीरीज अंतर्गत लेटेस्ट स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने या फोनला Infinix Hot 12 Pro असे नाव दिले आहे. Infinix Hot 12 Pro आज प्रथमच भारतात विक्रीसाठी जात आहे. हा फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर विकला जाईल. ही विक्री आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. जाणून घेऊयात आज या सेलमध्ये तुम्हाला किती स्वस्तात फोन खरेदी करता येईल…
हे सुद्धा वाचा : Amazon GFF Sale : साऊंडबार मोठ्या सवलतीसह उपलब्ध, बघा आकर्षक ऑफर्स
Hot 12 Pro वर बँक ऑफर अंतर्गत, ICICI आणि Kotak बँक ग्राहकांना 1,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. ज्याची किंमत 6 GB RAM व्हेरियंटसाठी 9,999 रुपये आणि 8 GB RAM व्हेरियंटसाठी 10,999 रुपये असेल. Infinix ने 6GB + 64GB वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये ठेवली आहे.
यासोबत, तुम्ही दरमहा 416 रुपयांच्या EMI वर देखील फोन खरेदी करू शकता. जुन्या फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 11,250 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. म्हणजेच, संपूर्ण एक्सचेंज डिस्काउंट मिळाल्यानंतर तुम्ही फोन फक्त 749 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता.
या फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा फ्लुइड ड्रॉप नॉच गेमिंग डिस्प्ले मिळेल. डिस्प्ले HD+ रिझोल्युशनसह आला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन या सेगमेंटमध्ये सर्वात ब्राइट डिस्प्ले देतोय. फोनच्या 6GB व्हेरियंटमध्ये 3GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील दिला जातो, ज्यामुळे त्याची एकूण रॅम 9GB होते. तसेच, 8 GB वेरिएंटमध्ये तुम्हाला 5 GB अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम मिळेल, ज्यामुळे त्याची एकूण RAM 13 GB पर्यंत वाढते. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये octa-core UniSoc T616 चिपसेट आहे.