प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माताचा लेटेस्ट Infinix GT 20 Pro स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात लाँच झाला. त्यानंतर, या स्मार्टफोनची पहिली सेल आजपासून सुरू होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सेल अंतर्गत विशेष लाँच ऑफर अंतर्गत स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. Infinix GT 20 Pro च्या विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि पॉवरफुल प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. जाणून घेऊयात Infinix GT 20 Pro ची किंमत आणि ऑफर्स-
Infinix GT 20 Pro स्मार्टफोनची विक्री आज म्हणजेच 28 मे 2024 रोजी Flipkart आणि अधिकृत वेबसाईटवर 12 वाजता सुरू झाली आहे. या फोनच्या 8GB+256GB बेस व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. तर, फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंट 26,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सेलमध्ये हा फोन 2000 रुपयांच्या सवलतीसह येईल. लक्षात घ्या की, ही ऑफर HDFC, ICICI आणि SBI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यावरच मिळेल. येथून खरेदी करा
Infinix GT 20 Pro मध्ये 6.78 इंच लांबीचा LTPS AMOLED फुल HD+ डिस्प्ले आहे. या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसरसह Pixelworks X5 Turbo गेमिंग डिस्प्ले चिपसेट देखील आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज मिळणार आहे.
फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस 108MP मेन कॅमेरा उपलब्ध आहे. त्याबरोबरच, मागील बाजूस 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. आकर्षक सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये पॉवरसाठी 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्टिरिओ स्पीकर्स, ब्लूटूथ 5.3, Wi-Fi 6 आणि USB टाइप-C पोर्ट मिळेल.