32MP सेल्फी आणि 108MP बॅक कॅमेरासह Infinix GT 20 Pro ग्लोबली लाँच, बघा Powerful स्पेसिफिकेशन्स। Tech News 

 32MP सेल्फी आणि 108MP बॅक कॅमेरासह Infinix GT 20 Pro ग्लोबली लाँच, बघा Powerful स्पेसिफिकेशन्स। Tech News 
HIGHLIGHTS

Infinix चा नवा स्मार्टफोन Infinix GT 20 Pro टेक विश्वात लाँच

हा मोबाइल MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसरसह आणला गेला आहे.

Infinix GT 20 Pro फोन 12GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix चा नवा स्मार्टफोन Infinix GT 20 Pro लाँच झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ग्लोबली सादर करण्यात आलेला हा मोबाइल MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसरसह आणला गेला आहे. येत्या काही दिवसांत हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेतही प्रवेश करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. चला तर मग जाणून घेऊयात Infinix GT 20 Pro ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

हे सुद्धा वाचा: Realme Narzo 70x 5G आणि Realme Narzo 70 5G ची सेल आजपासून सुरू, मिळेल 1500 रुपयांचा Discount। Tech News

Infinix GT 20 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Infinix GT 20 Pro मध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले आहे. ही स्क्रीन AMOLED पॅनेलवर बनवण्यात आली आहे, जी 144Hz रिफ्रेश रेटवर काम करते. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. या फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी वर सांगितल्याप्रमाणे MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसर उपलब्ध आहे. Infinix च्या या फोनमध्ये 8GB रॅम आणि 12GB रॅम आहे. त्याबरोबरच, हा फोन 12GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो.

Infinix GT 20 Pro to launched: Key specs, design
Infinix GT 20 Pro to launched: Key specs, design

फोटोग्राफीसाठी, Infinix GT 20 Pro फोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या मागील पॅनलवर 108MP चा प्रायमरी सेन्सर आहे, त्यासोबत इतर 2MP सेन्सर देखील आहेत. त्याबरोबरच, यात आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी हा फोन 5,000 mAh बॅटरीला सपोर्ट करतो. आहे. त्यासह हा फोन 45W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज केला आहे.

Infinix GT 20 Pro मधील उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात JBL ड्युअल स्पीकर देण्यात आले आहेत. गेमिंगचा आनंद घेण्यासाठी फोनमध्ये इन-गेम व्हायब्रेशन आणि एक्स-ॲक्सिस लाइन मोटर असे ऑप्शन देखील आहेत. हा फोन Wi-Fi 6, NFC आणि IR ब्लास्टला देखील सपोर्ट करतो. तसेच, पाण्याच्या प्रतिकारासाठी Infinix GT 20 Pro फोन IP54 रेटिंगसह येतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo