Infinix GT 20 Pro ची किंमत लाँचपूर्वीच Confirm! आतापर्यंतचा सर्वात Powerful गेमिंग फोन। Tech News

Updated on 17-May-2024
HIGHLIGHTS

Infinix GT Verse लाँच इव्हेंट भारतात 21 मे रोजी होणार

कंपनी या फोनमध्ये आपले अनेक GT उपकरणे लाँच करणार आहे.

लाँचपूर्वीच आगामी Infinix GT 20 Pro स्मार्टफोनची किंमत उघड

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माताचे Infinix GT Verse लाँच इव्हेंट भारतात 21 मे रोजी होणार आहे. या इव्हेंदरम्यान, कंपनी आपले अनेक GT उपकरणे लाँच करणार आहे. या उपकरणांमध्ये Infinix GT 20 Pro आणि GTBook सिरीज समाविष्ट आहेत. Infinix GT 20 Pro स्मार्टफोन आधीच जागतिक बाजारपेठेत दाखल झाला आहे. त्यामुळे या फोनचे फीचर्स लाँच होण्यापूर्वीच उघड झाले आहेत. मात्र, लाँचपूर्वीच कंपनीने Infinix GT 20 Pro फोनची रेंज उघड केली आहे. या फोन्सशी संबंधित सर्व तपशील बघुयात-

हे सुद्धा वाचा: नवा IQOO Z9x 5G ची लेटेस्ट Vivo T3x 5G स्मार्टफोनसह जबरदस्त स्पर्धा, बघा दोन्हीचे टॉप 5 तपशील। Tech News

Infinix GT 20 Pro ची अपेक्षित किंमत

Infinix India ने आपल्या अधिकृत X म्हणेजच Twitter हँडलवर Infinix GT 20 Pro फोनची एक डेडिकेटेड पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये फोनची लाँच तारीख आणि किंमत श्रेणी उघड करण्यात आली आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा फोन 21 मे रोजी एका इव्हेंटदरम्यान लाँच केला जाणार आहे. स्मार्टफोनची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असेल, असे शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल गेमिंग फोन असेल असे कंपनीने सांगितले आहे.

Infinix GT 20 Pro चे अपेक्षित तपशील

वर सांगितल्याप्रमाणे, हा Infinix GT 20 Pro आधीच जागतिक बाजारपेठेत लाँच झाला आहे. त्यानुसार, या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले असेल, जो 144Hz रिफ्रेश रेटसह येईल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसरने सुसज्ज असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, Dimensity 8200 आपल्या अविश्वसनीय कार्यक्षम कामगिरीमुळे गेमप्ले बॅटरीवर नेहमीपेक्षा जास्त काळ टिकेल याची खात्री करतो.

स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB रॅम आणि 12GB रॅम ऑप्शन मिळतील. तर, यात 256GB इंटर्नल स्टोरेज देखील असेल. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील मिळणार आहे. फोनमध्ये OIS सपोर्टसह 108MP मेन कॅमेरा मिळेल. त्याबरोबरच, यात 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर देखील मिळतील. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32MP फ्रंट देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 45W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5000mAh बॅटरी मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :