लेटेस्ट Infinix GT 20 Pro च्या भारतीय लाँचची पुष्टी? मोबाईल Gaming ची मजा घेण्यासाठी व्हा सज्ज। Tech News 

लेटेस्ट Infinix GT 20 Pro च्या भारतीय लाँचची पुष्टी? मोबाईल Gaming ची मजा घेण्यासाठी व्हा सज्ज। Tech News 
HIGHLIGHTS

Infinix GT 20 Pro आधीच जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे.

भारतात 'GT Verse' नवी स्मार्टफोन सिरीज लाँच केली जाणार आहे.

Infinix GT 20 Pro च्या भारतीय लाँचची पुष्टी करण्यात आली आहे.

टेक ब्रँड Infinix मोबाईल गेमिंगच्या शौकीन असलेल्या युजर्ससाठी एक मस्त फोन घेऊन येत आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, ती भारतात ‘GT Verse’ लाँच करणार आहे. ही एक नवीन स्मार्टफोन सिरीज असेल, ज्या अंतर्गत Infinix GT 20 Pro फोन भारतात लाँच केला जाईल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Infinix GT 20 Pro आधीच जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. त्याबरोबरच, कंपनीने या फोनची India लाँच टाइमलाइन देखील उघड केली आहे.

Infinix GT 20 Pro भारतीय लॉन्चिंग डिटेल्स

Infinix कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन ‘GT सिरीज’ सादर करणार असल्याची घोषणा केली आहे. या सिरीजअंतर्गत किती आणि कोणते मोबाईल आणले जातील, हे अद्याप ब्रँडकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतु यापैकी एक शक्तिशाली गेमिंग उपकरण, Infinix GT 20 Pro भारतात लाँच होणार, अशी माहिती मिळाली आहे. हा मोबाईल मे 2024 मध्ये भारतात लाँच केला जाणार आहे. Infinix India ने अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून नव्या सिरीजबद्दल माहिती मिळाली आहे.

Infinix GT 20 Pro to launch soon: Key specs, design surface online
Infinix GT 20 Pro to launch soon: Key specs, design surface online

Infinix GT 20 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

वर सांगितल्याप्रमाणे, Infinix GT 20 Pro फोन आधीच जागतिक बाजारात लाँच झाला आहे. त्यानुसार, फोनचं स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Infinix GT 20 Pro 6.78 इंच लांबीचा फुल HD + डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, मोबाईलमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 8200 अल्टिमेट ऑक्टाकोर प्रोसेसर आहे, जो 3.1 GHz पर्यंत क्लॉक स्पीडवर चालतो. हा स्मार्टफोन 12GB व्हर्चुअल रॅमला देखील सपोर्ट करतो. Infinix GT 20 Pro पाण्यापासून संरक्षणासाठी IP54 रेटिंगसह येतो.

फोटोग्राफीसाठी Infinix GT 20 Pro ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या मागील पॅनलवर 108MP चा प्राथमिक सेन्सर आहे, त्यासोबत इतर 2MP सेन्सर देखील आहेत. तर, सेल्फी घेण्यासाठी आणि रील बनवण्यासाठी हा फोन 32MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवरसाठी यात 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo