काही दिवसांपासून आपल्या डिझाईनमुळे चर्चेत असलेला फोन Infinix GT 10 Pro भारतात लवकरच लाँच होणार आहे. कंपनीने हा डिवाइस टीज करायला सुरुवात केली आहे. या फोनचे बरेच लीक्सदेखील पूढे आलेले आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा फोन भारतीय बाजारात Flipkartवर उपलब्ध होणार आहे. आता कंपनीने फोनची मायक्रोसाईट देखील Flipkart वर लाईव्ह केली आहे. दरम्यान, अनोख्या डिझाईनसह येणाऱ्या या फोनचे प्री-ऑर्डर डिटेल्स देखील कंपनीने जारी केले आहेत. प्री-ऑर्डरसह तुम्हाला मिळणारे ऑफर्सदेखील कंपनीद्वारे जाहीर करण्यात आले आहेत. Flipkart पेजनुसार, 27 जुलै रोजी फोनबद्दल काही खास माहिती समोर येईल. चला तर मग बघुयात सविस्तर-
Infinix GT 10 Pro स्मार्टफोन भारतात 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध केला जाईल, असे फ्लिपकार्टवर लाइव्ह झालेल्या पेजनुसार पुढे आले आहे. मात्र, फोनची लाँच डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने अद्याप किंमतीबाबत अधिकृतपणे कोणताही खुलासा केलेला नाही.
> प्री-ऑर्डर करणार्या पहिल्या 5000 ग्राहकांना प्रो गेमिंग किट मिळण्याची संधी मिळेल. यामध्ये त्यांना अनेक वस्तू मिळतील.
> तसेच, ग्राहकांना 2000 रुपयांची झटपट सूट आणि 2000 रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर मिळेल.
> स्मार्टफोन 6 महिन्यांच्या मासिक हप्त्यांवर सुद्धा खरेदी करणार आहे.
Infinix GT 10 Pro फोनला ट्रान्सपरंट फोटोक्रोमॅटिक रिअर पॅनलसह सायबर मेका डिझाइनसह टीज करण्यात आले आहे. त्याची बॅक डिझाईन जवळपास Nothing Phone सारखी असण्याची शक्यता आहे. पण, डिव्हाइसमध्ये LED फ्लॅश असेल की नाही, याबाबत अद्याप काही माहिती नाही. Flipkart नुसार, Infinix GT 10 Pro मध्ये मध्यभागी पंच-होल डिस्प्ले आणि मागील बाजूस सिम कार्डच्या आकाराचे कॅमेरा मॉड्यूल असू शकते.
फ्लिपकातवरील मायक्रोसाईटवरून असे दिसून येते की, आगामी फोनमध्ये 120Hz रिफ्रेश दरासह AMOLED डिस्प्ले उपलब्ध असणे अपेक्षित आहे. AMOLED आणि OLED डिस्प्लेमध्ये चांगली कॉलिटी, उत्तम कलर रिप्रॉडक्शन, सूर्यप्रकाशात स्पष्ट व्हिजिबिलिटी, ट्रू ब्लॅक कलर, उत्तम व्युइंग अँगल, उत्तम कॉन्ट्रास्ट आणि चांगला बॅटरी बॅकअप दिला जातो.
फोटोग्राफीसाठी, Infinix GT 10 Pro मध्ये दोन 8MP लेन्ससह 108MP मुख्य कॅमेरा दिला जाऊ शकतो. या कॅमेरासह तुम्ही अधिक स्पष्ट इमेजेस कॅप्चर करू शकता. यासह तुम्हाला संपादन करण्यासाठी बरेच काही मिळेल. सध्या फोनच्या फीचर्सबद्दल एवढीच माहिती आहे. येत्या काही दिवसांमध्ये कंपनी फोनशी संबंधित इतर माहिती देखील शेअर करू शकते.