Infinix GT 10 Pro 5G Sale Offers: आकर्षक डिझाईनसह येणाऱ्या स्मार्टफोनवर खास ऑफर्स, बघा डिटेल्स
Infinix चा पहिला गेमिंग स्मार्टफोन GT 10 Pro 5G मागील आठवड्यात भारतात लाँच झाला.
फोनची किंमत 19,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
ICICI बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून खरेदी केल्यास पहिल्या सेलमध्ये 2,000 रुपयांची झटपट सूट
Infinix चा पहिला गेमिंग स्मार्टफोन GT 10 Pro 5G 3 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनची पहिली सेल आज म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी होणार आहे. Infinix GT 10 Pro 5G ची सेल आज दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर होणार आहे. पहिल्या सेलमध्ये फोनच्या खरेदीवर काही खास ऑफर्सही दिल्या जातील. यापूर्वी या फोनची प्री-बुकिंग 3 ऑगस्टपासून सुरू झाली होती. प्री-बुकिंग केलेल्या वापरकर्त्यांना फोनसोबत खास गेमिंग ऍक्सेसरीज बॉक्स ऑफर केला जात होता. त्याबरोरबच, पहिल्या सेलमध्ये वापरकर्त्यांना बँक सवलत, कॅशबॅक इत्यादींचा लाभ मिळेल.
Infinix GT 10 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स
हा स्मार्टफोन 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. फोनची किंमत 19,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ICICI बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून खरेदी केल्यास पहिल्या सेलमध्ये 2,000 रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे. तुम्ही दरमहा 704 रुपयांमध्ये EMI सह फोन खरेदी करू शकता.
Infinix GT 10 Pro 5G
फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह, नथिंग फोन सारखीच लाइटिंग आहे, जी नोटिफिकेशन्स आणि चार्जिंग इत्यादी दरम्यान ब्लिंक होत राहते. यामध्ये ब्लूटूथ, वाय-फाय व्यतिरिक्त कनेक्टिव्हिटीसाठी 3.5 मिमी ऑडिओ जॅक देखील उपलब्ध असेल. या फोनमध्ये सायबर मेका डिझाइनचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे त्याचा बॅक पॅनल पारदर्शक दिसत आहे.
Infinix चा हा गेमिंग स्मार्टफोन 6.67-इंच लांबीच्या AMOLED डिस्प्लेसह येतो. फोनच्या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल म्हणजेच FHD+ आहे. हा डिस्प्ले कमी पॉवर वापरतो, अधिक विविड पिक्चर कॉलिटी प्रदान करतो आणि LCD सारख्या इतर डिस्प्ले तंत्रज्ञानाच्या तुलनेत जास्त स्पीड देतो. त्यात बायोमेट्रिक म्हणजेच फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध नाही. फोनच्या डिस्प्लेमध्ये पंच-होल डिझाइन देण्यात आले आहे.
Infinix GT 10 Pro मध्ये MediaTek Dimensity 8050 प्रोसेसर उपलब्ध आहे. या चिपसेटसह फास्ट आणि सर्वोच्च गेमिंग एक्सपेरियन्स मिळेल. यासह 8GB RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध देखील आहे. तुम्ही फोनची रॅम वर्चुअली एक्सपांड करू शकता. तसेच, फोनची इंटर्नल मेमरी मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येते. हे Android 13 वर आधारित XOS 13 वर कार्य करते.
या Infinix फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे, ज्यामध्ये 45W USB Type C फास्ट चार्जिंग फीचर उपलब्ध आहे. Infinix GT 10 Pro च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनमध्ये 108MP मुख्य म्हणजेच प्राथमिक कॅमेरा आहे. याशिवाय फोनच्या मागील बाजूस 2MP मॅक्रो आणि 2MP थर्ड डेप्थ कॅमेरा उपलब्ध असेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile