अरे बापरे! 1 जानेवारीपासून UPI ID होणार Deactivate? आजच आटपून घ्या ‘ही’ महत्त्वाची कामे। Tech News 

अरे बापरे! 1 जानेवारीपासून UPI ID होणार Deactivate? आजच आटपून घ्या ‘ही’ महत्त्वाची कामे। Tech News 
HIGHLIGHTS

NPCI ने 1 जानेवारीपासून UPI ID ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या.

सर्व बँक आणि थर्ड पार्टी Apps ने UPI आयडी निष्क्रिय करणे सुरू केले आहे.

जुन्या UPI ID ने फसवणूक होण्याची अधिक शक्यता असते.

जसजसे नवे वर्ष जवळ येत आहे, तसतसे नवीन नियम, अटी शर्ती प्रत्येक गोष्टीमध्ये लागू करण्यात येत आहे. दरम्यान, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने निष्क्रिय UPI ID ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सविस्तरपणे बोलायचे झाल्यास जर तुम्ही एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ UPI आयडीद्वारे ऑनलाइन व्यवहार करत नसाल, तर तुमचा UPI ID 1 जानेवारी 2024 पासून ब्लॉक केला जाईल.

हे सुद्धा वाचा: OnePlus 11 सिरीज स्मार्टफोनवर मिळतोय बंपर Discount, ऑर्डर करण्यापूर्वी निवडा ‘हा’ महत्त्वाचा ऑप्शन। Tech News

का ब्लॉक केले जातील UPI ID?

आपणा सर्वांना माहितीच आहे की, आजकाल Google Pay, PhonePe आणि Paytm सारखे प्लॅटफॉर्म ऑनलाइन पैसे पाठवण्यासाठी UPI ID चा वापर करतात. ही ID तुमच्या मोबाईल नंबरसह कनेक्ट असते. पण बरेचदा असे होते की, एकाच मोबाईल नंबरशी अनेक UPI ID जोडलेले असतात आणि ते दीर्घकाळ वापरले देखील जात नाहीत.

UPI Id block
UPI Id block

NPCI अहवालानुसार, ग्राहक जुना UPI ID निष्क्रिय न करता नवीन मोबाइलवरील नवीन UPI ​​ID शी मोबाईल नंबर लिंक करतात. या संदर्भात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. NPCI च्या सूचनेनुसार, सर्व बँक आणि थर्ड पार्टी Apps ने UPI आयडी निष्क्रिय करणे सुरू केले आहे. खरं तर, जुन्या UPI ID ने फसवणूक होण्याची अधिक शक्यता असते. अशा स्थितीत NPCI कडून ते ब्लॉक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ID ब्लॉक होऊ नये म्हणून काय करावे?

तुमचा जुना निष्क्रिय ID बंद होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला हा ID सक्रिय करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला 31 डिसेंबर 2023 पूर्वी तुमचा जुना ID ऍक्टिव्ह करण्याची गरज आहे. यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही, कवळ UPI ID द्वारे पेमेंट करून ते सक्रिय करावे लागेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo