मोबाईल ऑपरेटर आयडिया सेल्युलर सध्या चीनची TCL कम्युनिकेशनकडून एक 4G स्मार्टफोन निर्माण करण्यासाठी बातचीत करत आहे. आयडिया आपल्या 4G सेवांची गती अधिक वाढवण्यासाठी हे सर्व करत आहे.
ह्यासंबंधी एका तज्ज्ञांनी सांगितले होते की, सध्यातरी ह्या विषयावर चर्चा केली जात आहे. ह्याच्या सर्व पैलूंचा अभ्यास केला जातोय. डिवाइसच्या खरेदीसाठी लवकरच आरएफपी दिला जाईल.
आयडिया 4G सेवांसोबत 4G रेडी स्मार्टफोन आणून जास्तीत जास्त यूजर्सला आपल्याकडे आकर्षित करणाराय. असे करुन आयडिया देशात असलेल्या प्रतिस्पर्धी जसे की एअरटेल, वोडाफोन आणि रिलायन्स इत्यादींना मागे टाकण्याच्या प्रयत्नात आहे.
डिसेंबरमध्ये रिलायन्स आणि वोडाफोन आपली 4G सेवा लाँच करु शकते. मात्र ह्याबाबतीत एअरटेल सर्वात पुढे आहे.आयडियाने आपल्या ह्या नवीन प्लॅनच्या अंतर्गत ७५० शहरांत २०१६ च्या सुरुवातीपर्यंत 4G सेवा आणू इच्छिते.
तर आतापर्यंत अल्काटेल वन टचने ह्याविषयी कोणतेही वक्तव्य केलेले नाही.