मोबाईल निर्माता कंपनी आयबेरीने आपला नवीन स्मार्टफोन ऑक्सस स्टनर बाजारात आणला आहे. कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत १४,९९० रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन बुधवारपासून एक्सक्लुसिव्हरित्या ऑनलाइन शॉपिंग साइट ebay इंडियावर उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर कंपनीने अशी माहिती दिली आहे की. लाँचच्या दिवसापासून ह्या स्मार्टफोनच्या खरेदीवर यूजरला ७,९९० रुपयाचे ऑक्सस आयवॉच स्मार्टवॉच जिंकण्याची संधी मिळेल.
ह्या स्मार्टफोनसह एक व्हर्च्युअल रियालिटी हेडसेटसुद्धा दिला जात आहे. हा व्हीआर हेडसेटच्या मदतीने यूजर कंटेंटला ३६० डिग्री कोनात 3D डायमेंशनल अंदाजात पाहू शकतील.
आयबेरी ऑक्सस स्टनर स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची HD IPS डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ही डिस्प्ले 178 डिग्रीच्या व्ह्युविंग अँगल्स देऊ शकते. डिस्प्ले वर कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे संरक्षण दिले गेले आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मिडियाटेक MT6753 चिपसेट आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. दोन्ही कॅमेरे LED फ्लॅशसह येतात. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर काम करतात. हा स्मार्टफोन 3000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. ह्यातील बॅटरी क्विक चार्जिंगला सपोर्ट करते.
कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये 4G LTE सपोर्टसह ब्लूटुथ, वायफाय, GPRS/ एज, 3G, GPS/A-GPS आणि मायक्रो-USB फीचर्स दिले आहेत. त्याचे परिमाण 143.6x72x7.9mm आणि ह्याचे वजन 141 ग्रॅम आहे.
हा स्लाइड शो पाहा- मेटल बॉडी सह येणारे भारतातील काही आकर्षक स्मार्टफोन्स
हेदेखील वाचा – २४ फेब्रुवारीला लाँच होऊ शकतो शाओमी Mi 5 स्मार्टफोन