मोबाईल निर्माता कंपनी आयबॉलने आपला नवीन टॅबलेट स्लाइड गॉर्जियो 4GL बाजारात आणला आहे. कंपनीने आपल्या ह्या टॅबलेटची किंमत ६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा टॅबलेट लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
ह्या टॅबलेटसह कंपनीने 5 डिटेचेबल MSLR लेन्ससुद्धा लाँच केले आहे. ह्या लेन्सला तुम्ही १४९९ रुपयात खरेदी करु शकता.
आयबॉल स्लाइड गॉर्जियो 4GL टॅबलेटच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 7 इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1024×600 पिक्सेल आहे. हा टॅबलेट 1GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्या टॅबलेटमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. दोन्ही कॅमे-यांसह LED फ्लॅशसुद्धा दिली गेली आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर काम करतो.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात ब्लूटुथ, GPRS/ एज, 3G, वायफाय, GPS आणि मायक्रो-USB फीचर दिले आहे. हा टॅबलेट 3500mAh बॅटरीने सुसज्ज आहे.
त्याचबरोबर हा डिवाइस ड्यूल USB सह येतो, ज्याच्या मदतीने यूजर एकाच वेळी टॅबलेटला चार्जसुद्धा करु शकतील आणि इतर USB डिवाइसशी कनेक्टसुद्धा करु शकतील. टॅबलेटमध्ये दोन 4G सिमसाठी सपोर्ट आहे. टॅबलेटमध्ये 21 क्षेत्रीय भाषांमध्ये काम केले जाऊ शकते.
हेदेखील वाचा- अखेर भारतात लाँच झाला ब्लॅकबेरीचा पहिला अॅनड्रॉईड स्मार्टफोन प्रीव
हेदेखील वाचा- मायक्रोसॉफ्ट लूमिया 650 स्मार्टफोनची किंमत झाली लीक