हा स्मार्टफोन 1GHz 64 बिट क्वाड-कोर प्रोसेसर, माली-T720 GPU आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. त्याबरोबर ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने ३२जीबीपर्यंत वाढवू शकतो.
मोबाईल निर्माता कंपनी आयबॉलने आपला नवीन स्मार्टफोन अँडी स्प्रिंटर लाँच केला आहे. हा एक 4G स्मार्टफोन आहे आणि ह्याची किंमत ७,०९९ रुपये आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या आयआर रिमोट अॅप्लिकेशन, युनिवर्सल रिमोटच्या मदतीने यूजर टेलिव्हिजन सेट, सेट टॉप बॉक्स, डीव्हीडी प्लेअर आणि इतर डिवायसेसवर नियंत्रण ठेवू शकता.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची FWVGA IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 480×854 पिक्सेल आहे. ह्याच्या डिस्प्लेची तीव्रता 195.9ppi आहे. हा स्मार्टफोन 1GHz ६४ बिट क्वाड-कोर प्रोसेसर, माली-T720 GPU आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. त्या;बरोबर ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने ३२जीबीपर्यंत वाढवू शकतो.
ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह ८ मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा आणि ३.२ मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा २१००mAh बॅटरीने सुसज्ज आहे,
ह्याच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये 4G मध्ये 3G, GPRS/ एज, वायफाय 802.11 B/G/n, ए-GPS, मायक्रो-USB आणि ब्लूटुथसुद्धा दिले आहे, हा गोल्ड आणि वाइन ह्या दोन रंगात उपलब्ध होईल. अँडी स्प्रिंटरमध्ये ९ सिस्टम भाषा आणि २१ भाषांसाठी कीबोर्डसुद्धा दिला आहे.