Apple लवकरच आपली नवीन iPhone सीरीज iPhone 14 लाँच करणार आहे. ऍपलच्या म्हणण्यानुसार, ही सीरिज सप्टेंबरमध्ये बाजारात आणली जाईल, जरी ऍपलने अद्याप तारीख जाहीर केलेली नाही. तरी लीक्स रिपोर्टनुसार, Apple 13 सप्टेंबर 2022 रोजी iPhone 14 सीरीज लाँच करू शकतो. ऍपलचा iPhone 14 Pro Max मोठ्या कॅमेरा मॉड्यूलसह बाजारात आणला जाईल, असे लीक्स देखील आहेत. iPhone 14 आणि iPhone 14 Pro 6.1-इंच पॅनेलसह लाँच करण्याचे दावे देखील केले जात आहेत. तर iPhone 14 Plus आणि iPhone 14 Pro Max 6.7-इंच पॅनेलसह लॉन्च केले जात आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
हे सुद्धा वाचा : पहिल्या सेलवर जबरदस्त डील ! 50MP कॅमेरा असलेल्या Moto G42 वर मिळतेय भारी सूट
लीक्सनुसार, Apple च्या iPhone 14 सीरीजमध्ये एक मोठा कॅमेरा मॉड्यूल मिळू शकतो. एका टिपस्टरने फोनच्या फीचर्सबद्दल माहिती दिली आहे की, iPhone 14 Pro Max 12-मेगापिक्सेलऐवजी 48-मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाईल. असे झाल्यास ऍपलच्या बाजूने हा मोठा बदल असेल. ऍपल फोनमध्ये सामान्यतः चांगले कॅमेरे असतात, परंतु हा बदल iPhone 14 सिरीजमधील कॅमेरा परफॉर्मन्स आणखी वाढवेल.
Apple ने अद्याप अधिकृतपणे तारीख जाहीर केलेली नाही, परंतु लीक्सनुसार, Apple 13 सप्टेंबर रोजी iPhone 14 सिरीज लॉन्च करू शकतो. Apple या इव्हेंटमध्ये Apple Watch Series 8 आणि Watch Pro व्हर्जन देखील लाँच करणार आहे.
यापूर्वी, Max Weinbach ने ट्विटरवर iPhone 14 Pro ची डिझाईन इमेज ट्विट केली होती आणि दावा केला होता की iPhone 14 सिरीज नॉचशिवाय ऑफर केली जाईल. iPhone 14 Pro चे डिझाईन स्केच सादर करताना असाही दावा करण्यात आला की, iPhone 14 Pro पंचहोल कॅमेरा डिस्प्लेसह लाँच केला जाईल.