Huawei ने भारतात आपला Y9 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा नवीन फोन कंपनी ने दिल्ली मध्ये आयोजित एक इवेंट मध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची खासियत याचा नॉच डिस्प्ले, डुअल रियर आणि फ्रंट कॅमेरा आणि किरिन 710 चिपसेट हि आहे. अमेझॉन ने या डिवाइससाठी वेगळी माइक्रो साइट तयार केली गेली ज्यावरून समजते कि हा स्मार्टफोन खासकरून अमेझॉन इंडिया वर सेल केला जाईल. तसेच हा स्मार्टफोन लॉन्च ऑफर अंतर्गत हेडफोंस सोबत येतो.
Huawei Y9 मध्ये 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 2340 x 1080p आहे आणि याचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 आहे. कंपनी ने याला फुलव्यू डिस्प्ले पॅनलचे नाव देत आहे आणि याला 3D कर्व्ड डिजाइन देण्यात आली आहे. वर सांगितल्या प्रमाणे, हा स्मार्टफोन HiSilicon किरिन 710 SoC ओक्टा कोर प्रोसेसर द्वारा संचालित आहे जो AI पॉवर 7.0 सह येतो आणि सर्व AI सम्बंधित टास्क करतो. हा फोन 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज सह येतो. हा कंपनीच्या GPU टर्बो टेक्नॉलॉजी सह येतो जी डिवाइसची ग्राफिक परफॉरमेंस वाढवते आणि हि पॉवर कंजम्प्शन कमी करते.
ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर डिवाइस मध्ये डुअल रियर आणि फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Huawei Y9 च्या मागे 13 MP + 2 MP चा डुअल कॅमेरा देण्यात आला आहे जो AI सीन डिटेक्शन आणि बोकेह फीचर सह येतो. डिवाइसच्या फ्रंटला पण 16MP + 2MP चा डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. 16MP सेंसर f/2.0 अपर्चर लेंस सह सादर केला गेला आहे आणि हा 4-इन-1 पिक्सल बिनिंगला सपोर्ट करतो ज्यामुळे लो-लाइट फोटोग्राफी चांगली होऊ शकते. फोन मध्ये 4000mAh ची बॅटरी आहे जी स्मार्ट पॉवर कंसम्पशन ऑप्टीमाइजेशन सपोर्ट सह येते ज्यमुळे पॉवर सेव केली जाऊ शकते.
Huawei Y9 Rs 15,990 मध्ये लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन खासकरून अमेझॉन इंडिया वर सेल केला जाईल आणि याची विक्री 15 जानेवारी पासून सुरु होईल. हा हँडसेट सफायर ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक कलर मध्ये येतो. कंपनी लॉन्च ऑफर अंतर्गत मोफत Boat ROCKERZ 255 SPORTS ब्लूटूथ इयरफोंस ऑफर करत आहे, आणि हि ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे.