डुअल कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरी सह 10 जानेवारीला भारतात लॉन्च होईल Huawei Y9 (2019)

डुअल कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरी सह 10 जानेवारीला भारतात लॉन्च होईल Huawei Y9 (2019)
HIGHLIGHTS

Huawei चा Huawei Y9 (2019) डुअल फ्रंट आणि रियर कॅमेरा सेटअप सह येईल, म्हणजे डिवाइस मध्ये एकूण चार कॅमेरे दिले जातील.

महत्त्वाचे मुद्दे

  • खासकरून अमेझॉन इंडिया वर होईल उपलब्ध
  • एकूण चार कॅमेरा असतील या फोन मध्ये
  • दोन वेरिएंट्स मध्ये केला जाऊ शकतो लॉन्च

Huawei Y9 (2019) भारतात 10 जानेवारीला लॉन्च केला जाणार आहे. याआधी कंपनी ने 7 जानेवारीसाठी मीडिया इनवाइट्स पाठवले होते जे नंतर थांबवण्यात आले. Huawei Y9 (2019) भारतात पहिला Y-सीरीज स्मार्टफोन असेल. जवळपास एक महिन्या पूर्वीच कंपनी ने भारतात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Mate 20 Pro पण लॉन्च केला आहे. हुवावे आपल्या ऑनर ब्रँड च्या माध्यमातून देशात ई-ब्रँड वाढवण्यासाठी आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत आहे.

भारतात सध्या हुवावेचे Mate 20 Pro, P20 Pro, P20 Lite, Nova 3 आणि Nova 3i डिवाइसेज उपलब्ध आहेत. Huawei Y9 (2019) च्या लॉन्च सह कंपनीचा अजून एक मिड-रेंज स्मार्टफोन या लिस्ट मध्ये सामील होईल जो Xiaomi Redmi Note 6 Pro, Honor 8X आणि Asus Zenfone Max Pro M2 ला टक्कर देईल. लॉन्चच्या आधीच आपल्याला माहित आहे कि हा स्मार्टफोन फक्त अमेझॉन इंडिया वर लॉन्च केला जाईल. Amazon इंडिया वरच सर्वात आधी हा डिवाइस टीज केला गेला होता. Huawei Y9 (2019) चीन मध्ये ऑक्टोबर 2018 मध्ये लॉन्च केला गेला होता, पण चीन मध्ये हा स्मार्टफोन Huawei Enjoy 9 Plus नावाने लॉन्च केला गेला होता. Huawei

Huawei Y9 (2019) स्पेसिफिकेशंस

Huawei Y9 (2019) मध्ये 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले आहे ज्याचे रेजोल्यूशन 2340×1080 पिक्सल आहे आणि याचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 आहे. हा स्मार्टफोन ओक्टा-कोर किरिन 710 चिपसेट द्वारा संचालित आहे जो 2.2GHz वर क्लोक्ड आहे आणि हा माली- G51 MP4 ग्राफिक्सची सोबत देण्यात आली आहे. डिवाइस मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्यतिरिक्त 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज विकल्प पण उपलब्ध आहे. स्मार्टफोनच्या बॅकला 16 मेगापिक्सलचा एक कॅमेरा देण्यात आला आहे जो फेज डिटेक्शन ऑटोफोकस आणि f/2.0 अपर्चर सह येतो, तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये दुसरी लेंस 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे ज्याचा अपर्चर f/2.4 आहे. डिवाइसच्या फ्रंटला पण डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एक 13 मेगापिक्सलचा सेंसर आहे जाचे अपर्चर f/1.8 आहे तथा दुसरा f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे.

Huawei Y9 (2019) किंमत

हा स्मार्टफोन एंड्राइड 8.1 ओरियो वर आधारित EMUI 8.2 वर चालतो आणि डिवाइसच्या बॅकला एक फिंगरप्रिंट सेंसर आहे. कनेक्टिविटी पर्याय पाहता हा स्मार्टफोन WiFi, ब्लूटूथ, GPS आणि 4G LTE सप्पोर्ट सह येतो आणि डिवाइस मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. अशा आहे कि Huawei Y9 (2019) च्या बेस वेरिएंटची किंमत भारतात Rs 15,000 च्या आत असू शकते.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo