Huawei Y9 (2018) ची झाली अधिकृत घोषणा, डुअल रियर कॅमेरा आणि 4,000mAh ची बॅटरी असेल यात

Updated on 12-Mar-2018
HIGHLIGHTS

Huawei Y9 (2018) चा डिजाइन मोठ्या प्रमाणात Mate 10 Lite सारखी असेल.

हुवावे ने थाईलँड मध्ये Huawei Y9 (2018) स्मार्टफोन ची अधिकृत रीत्या घोषणा करण्यात आली आहे. डिवाइस च्या फ्रंटला 5.93 इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, जो 18:9 एस्पेक्ट रेश्यो सह येईल. 
या फोन मध्ये किरीन 659 असेल, जो 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज सह येईल. फोन ची इंटरनल स्टोरेज तुम्ही माइक्रो एसडी कार्ड ने वाढवू शकाल. Huawei Y9 (2018) स्मार्टफोन च्या कॅमेरा बद्दल बोलायाचे झाले तर यात पण Mate 10 Lite प्रमाणे 16MP+2MP चा डुअल रियर कॅमेरा आणि 13MP+2MP चा सेल्फी कॅमेरा आहे. 
Huawei Y9 (2018) मध्ये निदान काही गोष्टी Mate 10 Lite पेक्षा चांगल्या असतिल जसे Y9 (2018) एंड्रॉयड ओरियो वर लॉन्च केला जाईल पण Mate 10 Lite एंड्रॉयड नूगा वर चालतो. 
याव्यतिरिक्त Y9 (2018) ची बॅटरी कॅपेसिटी पण Mate 10 Lite च्या तुलनेने चांगली असेल. Y9 (2018) ची बॅटरी 4000 एमएएच ची असेल, तर Mate 10 Lite ची बॅटरी 3340 एमएएच ची आहे. पण सध्यातरी Y9 (2018) ची किंमत आणि उपलब्धता च्या बाबतीत जास्त माहिती मिळाली नाही.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :