Huawei ने त्यांचा नवीन बजेट मोबाईल फोन म्हणून Huawei Y7 Pro मोबाईल फोन वियतनामच्या बाजारात ड्यूल कॅमेरा सेटअप आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 प्रोसेसर सह लॉन्च केला आहे. हा मोबाईल फोन आता वियतमान मध्ये कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. या मोबाईल फोन म्हणजे Huawei Y7 Pro मोबाईल फोनची किंमत पाहता हा तिथे 3,990,000 वियतनामी डाँग मध्ये लॉन्च केला गेला आहे, जे जवळपास Rs 11,000 होतात.
Huawei Y7 Pro मोबाईल फोनच्या स्पेक्सची चर्चा करायची झाल्यास हा मोबाईल फोन एका 6.26-इंचाच्या HD+ डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 1520×720 पिक्सल आहे. तसेच या मोबाईल फोनच्या डिस्प्ले मध्ये तुम्हाला एक वाटर ड्राप नॉच पण मिळत आहे. विशेष म्हणजे हा मोबाईल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट सह लॉन्च केला गेला आहे. हा एक ओक्टा-कोर प्रोसेसर आहे.
मोबाईल फोन 3GB रॅम तसेच 32GB इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला गेला आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवू शकता. मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 13+2MP चा रियर कॅमेरा कॉम्बो मिळत आहे. तसेच फोन मध्ये एक 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये तुम्हाला एक 4,000mAh क्षमता बॅटरी पण मिळत आहे. त्याचबरोबर फोन मध्ये तुम्हाला 4G सपोर्ट सोबत इतर जवळपास सर्वच कनेक्टिविटी ऑप्शन मिळत आहेत.
या मोबाईल फोनच्या भारतातील लॉन्चची अजूनतरी कोणतीही माहिती मिळाली नाही, पण असे वाटत आहे कि जर हा मोबाईल फोन वियतनाम मध्ये बजेट श्रेणीत लॉन्च केला असेल तर हा भारतात पण येत्या काळात लॉन्च केला जाऊ शकतो. असे आधी पण झाले आहे कि कंपनी ने आपला एखादा मोबाईल फोन दुसऱ्या देशात लॉन्च केल्यानंतर भारतात लॉन्च केला आहे त्यामुळे कदाचित येत्या काळात हा मोबाईल फोन भारतात पण लॉन्च केला जाईल.