Huawei P30 Pro स्मार्टफोन मध्ये 10X ऑप्टिकल झूम सह असू शकतात चार रियर कॅमेरे

Updated on 24-Dec-2018
HIGHLIGHTS

एक रेंडर वरून समोर येत आहे की Huawei च्या आगामी फोन म्हणजे Huawei P30 Pro मोबाईल फोन मध्ये चार रियर कॅमेऱ्यांचा सेटअप असणार आहे, हा कॅमेरा सेटअप 10X ऑप्टिकल झूम सह येईल.

महत्वाचे मुद्दे:
 

  • आपला जगातील पहिला ट्रिपल कॅमेरा सेटअप असलेला फोन लॉन्च केल्यानंतर आता Huawei आपला Huawei P30 Pro मोबाईल फोन चार कॅमेऱ्यांसह लॉन्च करू शकते.
  • सॅमसंगने पण आपल्या A सीरीजचा एक मोबाईल फोन चार म्हणजेच क्वाड कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला आहे.
  • Huawei P30 Pro मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 10x ऑप्टिकल झूम एका टेलीफोटो लेंस मध्ये मिळणार आहे.

 

आता थोडेच दिवस उरले आहेत आणि ते संपताच आपण सर्व नवीन वर्षात पाऊल टाकणार आहोत. हे वर्ष वेगवेगळ्या ट्रेंड्स मुळे खूप चर्चेत होत. पण असे बोलले जात आहे की 2019 मध्ये आपण काही नवीन ट्रेंड्स आणि बदल बघणार आहोत. असे पण बोलू शकतो की नवीन वर्षात आपल्याला असे काही दिसेल ज्यामुळे मोबाईल फोन इंडस्ट्रीला एक नवीनच वळण मिळेल. येत्या वर्षात Huawei कडून त्यांच्या P सीरीजचा आगामी फोन म्हणजे Huawei P30 आणि Huawei P30 Pro मोबाईल फोन लॉन्च केले जाऊस शकतात. या मोबाईल फोन बद्दल इंटरनेट वर रेंडर पण समोर आले आहेत. या लीक मध्ये मोबाईल फोनचे काही फीचर्स समजले आहेत.

विशेष म्हणजे Huawei च्या आगामी फोन म्हणजे Huawei P30 Pro मध्ये तुम्हाला एक क्वाड अर्थात चार कॅमेरे असलेला सेटअप याच्या रियर पॅनल वर मिळू शकतो. असाच कॅमेरा सेटअप आपण नुकताच सॅमसंगच्या A सीरीजच्या एका मोबाईल फोन मध्ये बघितला आहे.

लक्षात असू दे की Huawei ने लॉन्च केलेला त्यांचा Huawei P20 Pro मोबाईल फोन जगातील पहिला असा मोबाईल फोन आहे जो ट्रिपल कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला गेला आहे. ते पाहता आपण असे म्हणूं शकतो की येत्या वर्षात या कॅमेरा सेटअप मध्ये अजून एक नवीन सेंसर जोडला जाऊ शकतो.

तसेच XDA डेवलपर्सचा एक रिपोर्ट पहिला असता त्यातून असे समोर येत आहे की Huawei P30 Pro मोबाईल फोन मध्ये जो कॅमेरा असणार आहे, त्यातील तीन कॅमेरा फक्त फोट काढण्यासाठी असतील तर चौथा कॅमेरा ToF कॅमेरा असेल. जो 3D फेस स्कॅनिंग आणि मॉडलिंग साठी वापरला जाऊ शकतो. तसेच या फोन मधील कॅमेरा मध्ये एक सेंसर टेली फोटो लेंस असेल, जी 10x ऑप्टिकल झूम सह येईल.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :