Huawei ने यावेळी घोषणा केली आहे की त्यांनी आपल्या Huawei P20 सीरीज चे जवळपास 60 लाख यूनिट्स सेल केले आहेत. कंपनी ने आपले हे स्मार्टफोंस खुप कमी काळात मोठ्या प्रमाणावर सेल केले आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षी कंपनी ने Huawei P10 सीरीज यावर्षी Huawei P20 सीरीज च्या तुलनेत कमी सेल केले होते, पण यावर्षी हा आकडा 81 टक्क्यांनी वाढला आहे.
आशा प्रकाराचा मोठा सेल बघून हे सिद्ध होते की या सीरीज मध्ये डिवाइस खरच शानदार आहेत. कंपनी च्या हँडसेट प्रोडक्ट लाइन च्या प्रेसिडेंट Kevin Ho ने सांगितले आहे की, “अशा प्रकाराचा सेल बघून हे वाटते की आम्ही आमच्या बाजाराला चांगल्या पद्धतीने ओळखतो. तसेच आम्हाला आमच्या इनोवेशन आणि R&D वर पूर्ण विश्वास आहे.”
त्यांनी हे पण सांगितले की, “ही प्रगती आम्ही अशीच चालू रहावी अशी आमची इच्छा आहे, त्याचबरोबर अशी आशा केली जात आहे की हे वर्ष संपताना हा आकडा अजून वाढू शकतो.”
लक्षात असू द्या कंपनी ने Huawei P20 सीरीज अधिकृतपणे मार्च मध्ये लॉन्च करण्यात आली होती, तसेच Huawei P20 Lite पण याच महिन्यात लॉन्च करण्यात आली होती, पण Huawei P20 आणि Huawei P20 Pro स्मार्टफोंस एप्रिल मध्ये सेल साठी आले होते.
Huawei P20 Pro मध्ये कंपनी चा लेटेस्ट किरिन 970 SoC आहे जो डेडिकेटेड न्यूरल प्रोसेसिंग यूनिट (NPU) सह येतो आणि हा डिवाइस एंड्राइड ओरियो वर आधारित EMUI 8.1 वर चालतो. या स्मार्टफोन मध्ये 6.1 फुल HD+ OLED फुल व्यू डिस्प्ले आहे आणि डिवाइस च्या फ्रंट वर होम बटन आहे. हा होम बटन एजलेस फिंगरप्रिंट ला सपोर्ट करतो ज्यामुळे हा जेस्चर पण ओळखू शकतो जसे होम साठी लॉन्ग टॅप, बॅक साठी शॉर्ट टॅप आणि मल्टी टास्किंग साठी डावी आणि उजवी स्वाइप.
Huawei P20 Pro मधील ट्रिपल कॅमेरा मध्ये 40 MP RGB 1/1.7-इंच सेंसर, 20 MP मोनोक्रोम सेंसर आणि 8MP टेलीफोटो लेंस आहे. डिवाइस च्या फ्रंट ला 24.8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे जो 3D पोर्ट्रेट लाइट इफेक्ट ला सपोर्ट करतो. हा डिवाइस 360 फेस अनलॉक फीचर सह येतो जो सेकंड्स मध्ये डिवाइस अनलॉक करू शकतो. तसेच डिवाइस मध्ये 4000mAh ची बॅटरी आहे.