मोबाईल निर्माता कंपनी हुआवे लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन P9 सादर करण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून ह्या स्मार्टफोनविषयी बरीच माहिती समोर आली होती आणि आता नवीन मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या ह्या स्मार्टफोनला ४ प्रकारांत लाँच करेल असे सांगण्यात येतय.
वेंचर बीट ह्या वेबसाइटने ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर अहवालात अशीही माहिती दिली आहे की, हुआवे ह्या डिवाइसला MWC ट्रेड शो ऐवजी एक वेगळा कार्यक्रम आयोजित करुन त्यात सादर करेल.
मिळालेल्या माहितीनुसार, हुआवे रेगुलर P9, P9 लाइट आणि P9 मॅक्स असे प्रकार आहेत. ह्यातील चौथा प्रकार P9 चा प्रीमियम व्हर्जन असू शकतो असे सांगण्यात येत आहे. ह्याच्या चौथ्या प्रकारात मोठी स्क्रीन, जास्त रॅम आणि स्टोरेज असू शकते. त्याशिवाय ह्या रिपोर्टमध्ये अशी माहिती दिली आहे की, हुआवेच्या ह्या चौथ्या प्रकारात सर्वात खास असा कॅमेरा असेल. ह्यात ड्युल कॅमेरा सेटअप असण्याचीसुद्धा माहिती दिली गेली आहे, ज्यात एक सेंसर १२ मेगापिक्सेलचा असेल. ह्यात काही कॅमेरा ट्रिकसुद्धा दिल्या आहेत.
अलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार, हुआवेचा हा स्मार्टफोन खूप उत्कृष्ट कॅमे-याने सुसज्ज असेल. हुआवे P9 मध्ये कॅमेरा सेटअपवर बरेच लक्ष देण्यात आले आहे. शाओमी टूडे अहवालात दिल्या गेलेल्या माहितीनुसार, हा फोन ड्यूल कॅमेरा सेटअपसहित ड्यूल LED फ्लॅश आणि लेजर ऑटोफोकससह उपलब्ध होईल.
हुआवे P9 स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची AMOLED डिस्प्ले असू शकते, ज्याचे रिझोल्युशन 2560×1440 पिक्सेल असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन हुआवेच्या किरीन 950 ऑक्टाकोर चिपसेट आणि 4GB रॅमने सुसज्ज असू शकतो.