ड्यूल कॅमे-याने सुसज्ज असलेला हुआवे P9, P9 प्लस स्मार्टफोन लाँच

ड्यूल कॅमे-याने सुसज्ज असलेला हुआवे P9, P9 प्लस स्मार्टफोन लाँच
HIGHLIGHTS

ह्या दोन्ही फोन्समध्ये सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात ड्यूल रियर कॅमेरा दिला गेला आहे. हुआवेने ह्या रियर कॅमे-याला प्रमुख कॅमेरा बनवणारी कंपनी लिकासह मिळून बनवले आहे.

मोबाइल निर्माता कंपनी हुआवेने बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन P9 आणि P9 प्लस लाँच केले आहेत. लंडनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हे स्मार्टफोन्स लाँच केले गेले आहे. ह्या स्मार्टफोन्सची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात ड्यूल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हुआवेने ह्या रियर कॅमे-याला प्रमुख कॅमेरा बनविणा-या लिका कंपनीसह मिळून बनवले आहे.

 

कंपनीने आपल्या ह्या कॅमे-याला ‘ड्यूल लेन्स कॅमेरा’ असे नाव दिले आहे. P9 आणि P9 प्लसमध्ये कंपनीने १२ मेगापिक्सेलचे सेंसर्स दिले आहेत. कंपनीनुसार, कमी प्रकाशात किंवा जास्त प्रकाशात दोन्ही कॅमेरे मिळून शार्प आणि डिटेल्ड शॉट्स देतात. ह्या ड्यूल लेन्सेसमध्ये f/2.2 अॅपर्चरसुद्धा आहेत. दोन्ही फोन्समध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे.

 

तथापि, ह्या फोन्सची इतर वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत, जसे की बॅटरी, डिस्प्ले आकार आणि टाइप. त्याचबरोबर ह्याचे अंतर्गत स्टोरेज आणि मेमरीसुद्धा वेगवेगळी आहे. हुआवे P9 मध्ये 5.2 इंचाची पुर्ण HD (1080×1920 पिक्सेल) IPS LED डिस्प्ले आणि प्रेस टच-सेंसिटिव टेक्नॉलॉजीसुद्धा आहे. P9 3GB रॅम आणि 32GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. तर P9 प्लस मध्ये 4GB रॅम आणि 64GB  स्टोरेज मिळत आहे. P9 मध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तर P9 प्लसमध्ये 3400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

 

हेदेखील पाहा – ह्या अॅप्सच्या माध्यमातून भारतातील प्रेक्षणीय स्थळांना द्या भेट

 

हुआवे P9 आणि P9 प्लसचे काही वैशिष्ट्ये सारखीही आहेत. जसे की अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो (EMUI 4.1 सह), हिसिलिकोन किरिन 955 प्रोसेसर (2.5GHz वर 4 कॉर्टेक्स-A72 कोर, 1.8GHz मध्ये 4 कॉर्टेक्स-A53 कोर), मायक्रो-SD सपोर्ट (128GB पर्यंत), 4G LTE, वायफाय 802.11 a/b/g/n/ac, ब्लूटुथ v4.1, इन्फ्रारेड आणि USB टाइप-C कनेक्टिव्हिटी सपोर्ट देण्यात आला आहे. P9 चा आकार 145×70.9×9.95mm आणि वजन १४४ ग्रॅम आहे. तर P9 प्लसचा आकार 152.3×75.3×6.98mm आणि वजन १६२ ग्रॅम आहे.

हुआवे P9 3GB रॅम/32GB स्टोरेज व्हर्जनची किंमत जवळपास ४५,४०० रुपये (EUR 599) आहे, तर 4GB रॅम/64GB स्टोरेज व्हर्जनची किंमत जवळपास ४९,२०० रुपये ठेवण्यात आली आहे. हुआवे P9 प्लसची किंमत ५६,८०० रुपये (EUR 749) आहे. हा फोन १६ एप्रिलपासून २९ देशांमध्ये उपलब्ध होईल.

 

हेदेखील वाचा –अॅप्पल आयफोन SE 64GB ची भारतात किंमत असेल ४९,००० रुपये

हेदेखील वाचा – 4GB रॅमने सुसज्ज असलेला ओप्पो F1 प्लस स्मार्टफोन लाँच

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo