हुआवे P9 Lite स्मार्टफोन लाँच, १३ मेगापिक्सेलच्या आकर्षक कॅमे-याने सुसज्ज

Updated on 25-Apr-2016
HIGHLIGHTS

हुआवेने आपल्या P9 वेरियंटचा Lite व्हर्जन हुआवे P9 लाइट लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनला जर्मनीमध्ये EUR 299 (जवळपास २२,५०० रुपये) मध्ये केला गेला आहे. हा मे मध्ये खरेदी करता येईल.

हुआवेने आपल्या P9 वेरियंटचा लाइट व्हर्जन हुआवे P9 Lite लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनला जर्मनीमध्ये EUR 299 (जवळपास २२,५०० रुपये) मध्ये केला गेला आहे. हा मे मध्ये खरेदी करता येईल. ह्या लाँचला जर्मनीच्या वेबसाइटवर रिपोर्ट केला गेला आहे. ह्याची बहुतेक वैशिष्ट्ये सारखीच आहेत.

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.2 इंचाची FHD 1080×1920 पिक्सेलची डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर चालतो. त्याशिवाय ह्यात 1.7Ghz ऑक्टा-कोर + 2GHx क्वाड-कोर किरिन 650 प्रोसेसरसह 3GB रॅम दिली गेली आहे.स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
 

त्याशिवाय ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. त्याशिवाय ह्यात ड्यूल-लेन्सेससह f/2.2 अॅपर्चरसह दिला गेला आहे. ह्यात 3000mAH क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. हा फोन एक LTE स्मार्टफोन आहे. ह्यात आपल्याला वायफाय, ब्लूटुथ, GPS/A-GPS, GPRS/EDGE, 3G आणि मायक्रो-USB सपोर्ट दिले गेले आहे.

हेदेखील वाचा – LeEco Le 2, Le 2 प्रो, Le मॅक्स 2 स्मार्टफोन लॉन्च
हेदेखील वाचा – अॅप्पलने लाँच केला नवीन मॅकबुक, नवीन प्रोसेसरने सुसज्ज

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :