मोबाईल निर्माता कंपनी हुआवे लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन P9 लाइट लाँच करु शकते. तसे आतापर्यंत ह्या फोनविषयी बरीच माहिती समोर आली आहे. आता ह्या फोनची कथित फोटो समोर आले आहेत, ज्यात ह्या फोनचे लूक दिसत आहे.
ह्या फोनचे फोटो टिप्सटरद्वारा ट्विट केली गेली आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार, ह्या फोनमध्ये 5.2 इंचाची डिस्प्ले असेल. त्याचबरोबर हा फोन 7.6 mm पातळ असेल. हा मेटल डिझाईनसह सादर होईल. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि एक रेग्युलर मायक्रो-USB पोर्टसुद्धा असू शकते.
ह्या लीक झालेल्या फोटोंमध्ये हुआवे P9 लाइट स्मार्टफोनमध्ये खालच्या बाजूला ड्यूल स्पीकर दिले गेल आहे. ह्या फोटोंमध्ये जो फोन दिसत आहे, त्याच्या उजव्या बाजूला पॉवर आणि वॉल्यूम रॉकर बटन दिले आहे. मायक्रोफोनसाठी दिल्या गेलेल्या होलसह वरच्या दिशेला 3.5mm चा जॅकसुद्धा आहे.
तसेच स्मार्टफोनमध्ये डाव्या बाजूला फोनमध्ये सिम ट्रे असेल. तर P9 लाइट स्मार्टफोनचे परिमाण 146.8×72.5×7.6mm असू शकते.
हेदेखील वाचा – शाओमी अशा पद्धतीने साजरी करतेय होळी
हेदेखील वाचा – होळीचा आनंद द्विगुणित करतील हे वॉटरप्रुफ गॅजेट्स