Huawei P30 आणि Huawei P30 Pro मोबाईल फोन्स लॉन्च होण्यास थोडाच वेळ उरला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही स्मार्टफोन्स जवळपास दोन आठवड्यानंतर लॉन्च केले जाणार आहेत. जरी यांच्या लॉन्चसाठी वेळ असला तरी यांचे स्पेक्स आणि फीचर्स इंटरनेट वर समोर येतच आहेत. लॉन्चच्या आधी यांबद्दल भरपूर काही समोर आले आहेत. सर्व यांच्या लॉन्चची वाट बघत आहेत, त्यात लॉन्चच्या आधीच Huawei P30 Pro मोबाईल फोन Geekbench च्या लिस्टिंग मध्ये दिसला आहे.
Huawei P30 Pro मोबाईल फोन Huawei VOG-L29 नावाने लिस्ट केला गेला आहे, हा मोबाईल फोन एंड्राइड पाई सह इथे दिसत आहे, याव्यतिरिक्त यात तुम्हाला 8GB पर्यंतचा रॅम मिळण्याची शक्यता आहे, कारण लिस्टिंग मध्ये याबाबदल पण माहिती आहे. तसेच फोन मध्ये तुम्हाला एक 1.80GHz वाला Kirin 980 चिपसेट पण मिळू शकतो, पण बेंचमार्क बद्दल बोलायचे तर सध्या यावर विश्वास ठेवता येणार नाही, कारण अधिकृतपणे काहीही समोर आलेले नाही.
Geekbench च्या लिस्टिंग मध्ये मोबाईल बद्दल दोन वेगवेगळे रिजल्ट दिसत आहेत, विशेष म्हणजे Huawei P30 Pro मोबाईल फोनला सिंगल कोर मध्ये 3289 पॉइंट मिळाले आहेत, तर मल्टी-कोर मध्ये याला 9817 पॉइंट्स मिळाले आहेत. तसेच दुसऱ्या टेस्ट बद्दल बोलायचे तर याला सिंगल कोर मध्ये थोडे कमी म्हणजे 3251 पॉइंट्स मिळाले आहेत, तर मल्टी कोर मध्ये याला 9670 पॉइंट्स मिळाले आहेत. आता कोणत्या टेस्ट वर विश्वास ठेवावा हे समजत नाही.
असे समोर येत आहे कि Huawei P30 Pro मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक क्वाड-कॅमेरा सेटअप मिळणार आहे, तसेच फोन मध्ये तुम्हाला एक कर्व्ड AMOLED डिस्प्ले वाटरड्राप नोच सह मिळणार आहे, सोबतच फोन मध्ये तुम्हाला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण मिळेल. फोन मध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंग सपोर्ट पण मिळणार आहे.