Huawei फॅन्स कंपनीच्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Huawei P30 ची वाट बघत असताना नुकतेच याचे काही फीचर्स रेंडर्सच्या माध्यमातून समोर आले आहेत. बोलले जात आहे कि कंपनी हा फोन 2019 च्या पहिल्या सहामाहीत लॉन्च करू शकते. इसोबत आहि पण अशा आहे कि MWC 2019 म्हणजे मोबाईल वर्ल्ड कॉन्ग्रेसच्या लॉन्च इवेंट मध्ये याचा खुलासा केला जाऊ शकतो.
Huawei P30 चे कांसेप्ट आधारित फोटो आणि वीडियो समोर आला आहे. यात स्मार्टफोन प्रत्येक बाजूने दाखवण्यात आला आहे. हे पाहता स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेट-अप सह येऊ शकतो. त्याचबरोबर वाटरड्रॉप नॉच आणि टेक्सचर्ड ग्रेडिएंट बॅक पॅनल सह दिसत आहे. तसेच हुवावे पी30 मध्ये 3.5 एमएम ऑडियो जॅक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Huawei P30 च्या रेंडर्स नुसार यात वाटरड्रॉप नॉच डिस्प्ले असू शकतो. तसेच खालच्या भागातील बारीक चिन सोबत वर्टिकल पोजीशन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेट-अप पण दिला जाऊ शकतो. सोबतच ड्यूल एलईडी फ्लॅश सह बॅक पॅनल टेक्सचर्ड असू शकतो. इतकेच नव्हे, हा डिवाइस ग्रेडिएंट फिनिश सह युजर्स साठी येऊ शकतो. स्मार्टफोनच्या उजव्या बाजूला वॉल्यूम आणि पावर बटण आहेत.
Huawei P30 चे रेंडर म्हणजे ग्राफिक्स पासून बनलेले फोटो OnLeaks आणि 91Mobiles ने लीक केले आहेत. विशेष म्हणजे यात स्मार्टफोन 3.5 एमएम ऑडियो जॅक सह दाखवण्यात आला आहे. जो फोनच्या USB Type-C पोर्ट आणि स्पीकर ग्रिलच्या बाजूला दिला जाऊ शकतो. जर हि माहिती खरी ठरली कि Huawei च्या पी सीरीज मध्ये पुन्हा एकदा 3.5 एमएम ऑडियो जॅक परतणार असेल तर हे चांगलेच आहे कारण Huawei P20 मध्ये तो नव्हता.
विशेष म्हणजे ज्या स्मार्टफोन निर्माता कंपन्यांनी 3.5 एमएम जॅक ची सुट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांनी हा परत आणलेला नाही. त्यामुळे यावर अजूनतरी विश्व ठेवता येणार नाही.