हुवावे ने 27 मार्चला P20 सीरीज च्या लॉन्च ची तयारी केली आहे. पण लॉन्च च्या आधी पुन्हा एकदा स्मार्टफोंस ची किंमत लीक झाली आहे. आपल्या लेटेस्ट ट्वीट मध्ये, रोलाण्ड Quandt ने P20, P20 Lite आणि P20 Pro च्या युरोपातील किंमतींचा खुलासा केला आहे.
याआधी या सीरियल टिपस्टर ने या तिन्ही स्मार्टफोंस च्या किंमतींचा खुलासा केला होता. पण लेटेस्ट ट्वीट वरून जास्त अधिक डिटेल मध्ये माहिती मिळत आहे की कोणत्या वेरियंट ची किंमत काय असेल.
ट्वीट च्या आधारावर EU मध्ये हुवावे फक्त P20 आणि P20 Pro मॉडेल सादर करेल. 4 जीबी रॅम आणि 128 जीबी मॉडेल सह P20 ची किंमत €679 (जवळपास 54,700 रुपये) असेल. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी च्या इंटरनल स्टोरेज सह P20 Pro ची किंमत € 899 (जवळपास 72,500 रुपये) असेल.
विशेष म्हणजे Quandt ने लेटेस्ट ट्वीट मध्ये डिस्प्ले स्पेसिफिकेशन बद्दल माहिती दिली आहे. P20 मध्ये एक 5.8 इंचाचा डिस्प्ले असेल तर P20 Pro प्रो मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले असेल. त्यांनी हे सांगितले की EU (यूरोपीयन संघ) व्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्ये स्मार्टफोन चे अजून पण वेरियंट असू शकतात. याआधीच्या अफवा पाहता दूसरे वेरियंट P20 Lite आणि P20 Porsche Design edition असू शकतात.
आगामी Huawei P20 सीरीज च्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायाचे झाले तर तिन्ही मॉडेल नॉच डिजाइन सह एज-टू-एज फुल व्यू डिस्प्ले सह येतील. तिन्ही मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. हो, P20 Pro मध्ये AI कॅपेब्लिटी सह थर्ड सेंसर असू शकतो. बॅटरी बद्दल बोलले जात आहे की P20 3,400mAh च्या बॅटरी सह येईल, P20 Pro मध्ये 4,000mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे.