हुवावे ने MWC 2018 मध्ये आपला आगामी P20 सीरीज स्मार्टफोंस ला सादर नाही केले, हे 27 मार्च ला पॅरिस मध्ये एका इवेंट मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. लॉन्च च्या आधी या फोनचे फोटो लीक झाले आहेत.
लीकस्टर इवान ब्लास ने लीक इमेज पोस्ट करून याला Huawei P20 चे नाव दिले आहे. स्मार्टफोन च्या फोटो वरून याच्या डिजाइन चा खुलासा होत आहे, लीक इमेज मध्ये हा फोन डुअल रियर कॅमेरा सेटअप सह दाखवण्यात आला आहे, पण अफवा अशी आहे की फोन ट्रिपल रियर कॅमेरा सह येईल.
आधी एका रेंडर लीक मध्ये सांगण्यात आले होते की Huawei P20 आणि P20 plus ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येऊ शकतात. अशी पण शक्यता आहे की ब्लास ने पोस्ट केलेली इमेज Huawei P20 Lite ची असू शकते. या फोनच्या डिस्प्ले च्या टॉप वर iPhone X प्रमाणे नॉच असण्याची शक्यता आहे. हा हँडसेट 18:9 एस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह येऊ शकतो आणि फिंगरप्रिंट सेंसर डिवाइस च्या खालच्या बाजूस असण्याची शक्यता आहे. फोनची बॅक साइड ग्लास ची असू शकते.
याव्यतिरिक्त, स्लॅशलीक्स ने P20 आणि P20 Plus च्या रियर पॅनल बद्दल ट्वीट केले आहे. रेंडर वरून कळत आहे की यात ग्लास रियर पॅनल असू शकतो. सोबतच ट्रिपल रियर कॅमेरा वर्टिकली प्लेस असण्याची शक्यता आहे.