हुवावे चे तीन नवीन स्मार्टफोन 27 मार्चला होतील लॉन्च
या तिन्ही स्मार्टफोंस मध्ये 18:9 डिस्प्ले आस्पेक्ट रेशियो वाला असेल आणि याची डिजाइन पण iPhone X सारखी असेल.
अस दिसतय की लवकरच बाजार iPhone X च्या डिजाइन सारखे दिसणार्या स्मार्टफोंसनी भरणार आहे. जर टिपस्टर Evan Blass च्या दाव्यावर विश्वास ठेवला तर कंपनी आता Huawei P20 सीरीज अंतर्गत आपले तीन स्मार्टफोंस लवकरच लॉन्च करणार आहे. Evan Blass ने आता या फोनचे फोटो शेयर केले आहेत. आशा आहे की हे फोंस 27 मार्चला सादर होतील.
या फोटो ला जवळून बघितले तर यांच्यातील फरक दिसून येतो. Huawei P20 Lite आणि P20 डुअल कॅमेरा सेटअप सह सादर होऊ शकतात. हे आधी आलेल्या माहिती पेक्षा वेगळे आहेत ज्यात सांगण्यात आले होते की या फोन मध्ये तीन रियर कॅमेरा असतिल. Huawei P20 मध्ये होम बटन असेल, तर Huawei P20 Lite मध्ये मागच्या बाजूस फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. P20 Pro मध्ये तीन रियर कॅमेरा असतिल.
काही दिवसांपूर्वी या तिन्ही फोंस ची किंमत पण लीक झाली होती, ज्या नुसार Huawei P20 ची किंमत 679 यूरोस (जवळपास Rs 54,500), P20 Pro आणि P20 Lite च्या किंमती 899 यूरोस (जवळपास Rs 72,000) आणि 369 यूरोस (जवळपास Rs 30,000) असू शकतात.