Huawei P20 Lite मध्ये एक रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर असेल.
इवान ब्लास ने कथित Huawei P20 Lite चा एक फोटो ट्वीट केला आहे. हा फोन नॉच आणि डुअल रियर कॅमेरा सेटअप सह येईल. आधी अफवा आली होती कि Huawei P20 Lite मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असेल, पण ब्लास च्या ट्वीट नंतर अस वाटत आहे की या फोन मध्ये ट्रिपल नाही तर डुअल कॅमेरा सेटअप असेल, कारण स्मार्टफोंस लीक च्या बाबतीत ब्लास चा ट्रॅक रेकॉर्ड खुप चांगला आहे. ब्लास ने ट्वीट केलेल्या फोटो नुसार Huawei P20 Lite मध्ये सर्वात मोठा फरक याच्या फिंगरप्रिंट स्कॅनर च्या प्लेसमेंट मध्ये आहे. Huawei P20 Lite मध्ये एक रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर असेल, तर Huawei P20 मध्ये बायोमेट्रिक सेंसर असेल. P20 Lite चा बॅक पॅनल मॅट फिनिश सारखा दिसतो, तर P20 मध्ये ग्लॉसी बॅक फिनिश आहे. P20 Lite मध्ये किरिन 659 CPU चिपसेट आहे, जो एंड्रॉयड 8.0 ओरियो वर चालतो. या डिवाइस मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असण्याची शक्यता आहे. फोन ची बॅटरी 3520 एमएएच ची असू शकते. P20 Lite च्या डुअल कॅमेरा मध्ये लीका(Leica) ब्रांडिंग आणि हाइब्रिड-झुम क्षमतेसह 16MP चे सेंसर असतिल. कदाचित Huawei P20 ची घोषणा 27 मार्चला पॅरिस मध्ये केली जाऊ शकते.