Huawei P20 च्या स्पेसिफिकेशन चा झाला खुलासा, सुपर स्लो मोशन रिकॉर्डिंग फीचर असेल यात

Huawei P20 च्या स्पेसिफिकेशन चा झाला खुलासा, सुपर स्लो मोशन रिकॉर्डिंग फीचर असेल यात
HIGHLIGHTS

Huawei P20 मध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असू शकते.

Huawei P20 आणि P20 Pro स्मार्टफोन ला युरोपात 27 मार्चला सादर केले जाईल. P20 Pro च्या स्पेसिफिकेशन चा खुलासा मागच्या आठवड्यातच झाला होता आणि आता, Huawei P20 चे स्पेसिफिकेशन ऑनलाइन आले आहेत. लीक पेक्षा जास्त विशेष बाब ही आहे की याचे स्पेक्स एका जर्मन रिटेलर ने समोर आणले आहेत. 
काही दिवसांपूर्वी Huawei P20 चे स्पेसिफिकेशन  Winfuture.de ने जारी केले होते. ज्यानुसार या स्मार्टफोन मध्ये 2240 x 1080 पिक्सल च्या स्क्रीन रिजॉल्यूशन सह 5.8 इंचाचा एलसीडी डिस्प्ले असेल. सांगण्यात येत आहे की हा डिवाइस FHD+ रिजॉल्यूशन सह notch फीचर सोबत येऊ शकतो. हो पण या डिवाइस चा notch आयफोन पेक्षा छोटा असेल. 

पण लीक स्पेसिफिकेशन मध्ये फेस अनलॉक सुविधा असण्याचा उल्लेख नाही, पण आपण आशा आहे की हा अन्य फ्लॅगशिप एंड्रॉयड स्मार्टफोन सारखा फेस अनलॉक फीचर सह येईल तसेच आपण याआधी Honor च्या काही स्मार्टफोंस मध्ये ही टेक्नोलॉजी बघीतली आहे. आशा आहे की Huawei P20  4GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह किरीन 970 प्रोसेसर वर चालेल. हो, P20 Pro मध्ये 6GB रॅम आणि एक्सपांडेब्ल स्टोरेज सपोर्ट असण्याची शक्यता आहे.  
P20 आणि P20 Pro मध्ये मुख्य अंतर रियर कॅमेरा सेटअप असेल. असे बोलले जात आहे की, P20 मध्ये OIS सह एक 12MP आरजीबी सेंसर आणि of f/1.6 अपर्चर सह 20MP मोनोक्रोम सेंसर असेल. हुवावे ने या स्मार्टफोन साठी Leica सोबत मिळून काम केले आहे. लेजर ऑटो फोकस आणि दोन रियर कॅमेरा सेंसर च्या मध्ये LED फ्लॅश दिसत आहे. 

याव्यतिरिक्त, Huawei P20 स्मार्टफोन 960 fps आणि 720p रिजॉल्यूशन वर सुपर स्लो मोशन रिकॉर्डिंग ला सपोर्ट करतो. अंदाज लावला जात आहे की 24MP चा फ्रंट कॅमेरा लाइट फ्यूजन टेक्नोलॉजी सह येऊ शकतो, जो AI चा वापर करून इमेज ला ब्राइट करण्यास मदत करेल. 
लिस्टिंग वरून हे पण समजत आहे की हा डिवाइस डुअल सिम आणि डिस्प्ले पोर्ट सह यूएसबी टाइप-सी पोर्ट सपोर्टिव पण असेल. सोबतच, हा एनएफसी, ब्लूटूथ 4.2, एंड्रॉयड 8.1 ओरियो सह EMUI 8.1 आणि 3400 एमएएच च्या बॅटरी सह येईल. Huawei P20 तीन कलर वेरियंट मध्ये येईल, गुलाबी, ब्लू, आणि ब्लॅक. 
जर्मन रिटेलर सैटर्न ने या स्पेक्स बद्दल खुलासा केला आहे. एक ट्विटर यूजर @TabTechGER ने पण P20 च्या एका इमेज सह समान स्पेक्स आणि किंमतीचा खुलासा केला आहे, ज्यानुसार P20 ची किंमत €649 असेल आणि P20 Pro ची किंमत €899 असेल, तर P20 Lite ची किंमत € 369 असेल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo